भाजयुमो उपाध्यक्षासह चौघांचा डर्टी पिक्चर !

By Admin | Updated: July 3, 2014 14:40 IST2014-07-03T14:40:46+5:302014-07-03T14:40:46+5:30

अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून भाजयुमोचा जिल्हा उपाध्यक्ष विजय जिजाबराव पाटील व त्याच्या मित्राला संतप्त जमावाने चांगलेच चोपले.

Fourth, Dirty Picture with the Vice President! | भाजयुमो उपाध्यक्षासह चौघांचा डर्टी पिक्चर !

भाजयुमो उपाध्यक्षासह चौघांचा डर्टी पिक्चर !

>अतिप्रसंग : चौकडीला जमावाने नग्न करून चोपले
सावदा : अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून भाजयुमोचा जिल्हा उपाध्यक्ष विजय जिजाबराव पाटील (रा. सावदा) व त्याच्या मित्राला संतप्त जमावाने चांगलेच चोपले. मुलाला सोडविण्यास गेलेल्या विजयचे पोलीस असलेले वडील, भाऊ व मित्र अशा चारही जणांना संतप्त जमावाने नग्न केले आणि जोरदार मारहाण केली. विजय याचे वडील पो.कॉ. जिजाबराव पाटील व भाऊ पंकज पाटील हे त्यांना सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण झाली. जखमींना दवाखान्यात दाखल केल्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही माहिती मिळताच विजय व त्याचा मित्र सागर धांडे दवाखान्यातून फरार झाले. मुख्य आरोपी विजय पाटील परिसरात अरेरावी करायचा. त्यांना अटक करण्याचे पोलिसांपुढे आव्हान राहणार आहे. 
हा कुठला माज ?
■ बुधवारी दुपारी स्टेट बँकेच्या सावदा शाखेतून पैसे काढून येत असलेल्या १५वर्षीय तरुणीस विजय जिजाबराव पाटील व त्याचा मित्र सागर धांडे यांनी जबरदस्तीने वाहनात बसविले. 
■ या दोघांनी या तरुणीसोबत वाहनात तसेच चिनावल येथील सागर धांडे यांच्या घरी विनयभंग केला. या घटनेची वाच्यता केल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. 
■ विजय हा मोबाइलवर बोलत होता. ही संधी साधत तरुणीने तेथून पळ काढत आपली सुटका करून घेतली.घरी आल्यावर या घटनेची माहिती दिली. 
■ काही वेळाने विजय पाटील व सागर धांडे हे विश्रामगृहावर असल्याची माहिती नागरिकांना मिळाली. त्यांनी तिथे जाऊन विजय पाटील व सागर धांडे यांना बेदम मारहाण केली. 

Web Title: Fourth, Dirty Picture with the Vice President!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.