भडगाव येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा चौथा वर्धापनदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:18 IST2021-08-22T04:18:44+5:302021-08-22T04:18:44+5:30
भडगाव येथील संस्कृती फाऊंडेशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, बाळद रोड शिव कॉलनी येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सेवानिवृत्त ...

भडगाव येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा चौथा वर्धापनदिन
भडगाव येथील संस्कृती फाऊंडेशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, बाळद रोड शिव कॉलनी येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य सुनील पाटील, डॉ. नीलेश पाटील, अमळनेरचे कवी रमेश पवार, पत्रकार अशोक परदेशी होते. मान्यवर पुरस्कारार्थीमध्ये प्रताप कॉलेज अमळनेरचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. रमेश माने यांना सन २०१९-२०साठीचा, तर सन २०२०-२१ साठी ग्रामीण साहित्यिक अहिराणी कवी नामदेव महाजन यांना कवी केशवसुत पुरस्कार वितरण करून सन्मानित करण्यात आले.
वर्धापनदिन सोहळा यशस्वितेसाठी परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश कोळी, कवी वाल्मीक अहिरे, कवी संजय सोनार नगरदेवळेकर, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. बी. एस. भालेराव, पत्रकार बी. एन. पाटील, प्रा. दीपक मराठे, प्रा. अतुल देशमुख, डी. बी. कोळी यांनी परिश्रम घेतले.
वर्धापनदिनानिमित्त कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील व सचिव डॉक्टर पूनम पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक कवी रमेश धनगर यांनी सूत्रसंचालन केले. प्राध्यापक सुरेश कोळी यांनी आभार मानले.
210821\21jal_3_21082021_12.jpg
कवी नामदेव महाजन यांना सन्मानित करताना प्रा. सुरेश कोळी, डाॅ. निलेश पाटील, वाल्मीक अहिरे आदी.