कारमधून आलेल्या चौघांनी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:14 IST2020-12-29T04:14:19+5:302020-12-29T04:14:19+5:30

जळगाव : कारमधून आलेल्या चार तरुणांसह एका महिलेने जुना नशिराबाद रस्ता परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची ...

The four who came out of the car lured the minor girl away | कारमधून आलेल्या चौघांनी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले

कारमधून आलेल्या चौघांनी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले

जळगाव : कारमधून आलेल्या चार तरुणांसह एका महिलेने जुना नशिराबाद रस्ता परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.

शहरातील जुना नशिराबाद रोड परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या विधवा आई, आजी, मोठी बहीण व भावासोबत राहते. रविवार, २७ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास सर्व जण जेवण करून ओट्यावर बसलेले होते. त्यावेळी एका कार त्यांच्या घरासमोर थांबली. कारमध्ये चार मुले आणि एक महिला बसलेली होती. या सर्वांनी मुलीचे अपहरण केले. नातेवाइकांनी शोधाशोध केली असता ती मिळून आली नाही. दरम्यान, चार मुले आणि एका महिलेने फूस लावून पळवून नेल्याचे लक्षात आले. घटना घडताच अल्पवयीन मुलीच्या आईने शनिपेठ पोलीस स्टेशनला धाव घेतली आहे. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून अज्ञात चार मुले आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मनोज इंद्रेकर करीत आहे.

Web Title: The four who came out of the car lured the minor girl away