चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By Admin | Updated: June 4, 2017 17:42 IST2017-06-04T17:42:30+5:302017-06-04T17:42:30+5:30
अडावद : चारचाकी चालक पोलिसांच्या ताब्यात

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
ऑनलाईन लोकमत
अडावद,दि.4- चारचाकी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात विदगाव (ता.जळगाव) येथील तरूण जागीच ठार झाला. हा अपघात ब:हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील धानोरा येथील जि.प. मराठी शाळेसमोर आज दुपारी दीडवाजेच्या सुमारास झाला.
विदगाव येथील गजानन पंढरीनाथ कोळी (30) हा दुचाकीने (एम.एच.19 ए.व्ही. 2944) किनगावकडुन चोपड्याकडे जात होता. समोरुन येणा:या मालवाहु चारचाकीने (एम.एच. 19 एस. 6252) दुचाकीला जोरदार धडक दिली. यात गजानन यास जबर मार लागला. जखमी अवस्थेत त्यास 108 ने तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. परंतु रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची खबर मिळतात अडावद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, सहाय्यक फौजदार गरबळ सोनवणे, ज्ञानदेव कोळी हे घटनास्थळी दाखल झाले. वाहन चालक नईमोद्दीन मोहीयोद्दीन शेख (38, रा. चोपडा) यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.