मालवाहू रिक्षाला चारचाकीची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:17 IST2021-05-18T04:17:25+5:302021-05-18T04:17:25+5:30
जळगाव : पाण्याचे जार घेऊन जात असलेल्या मालवाहू रिक्षास भरधाव कारने धडक दिली. त्यात महेश पंढरीनाथ कोळी (वय ...

मालवाहू रिक्षाला चारचाकीची धडक
जळगाव : पाण्याचे जार घेऊन जात असलेल्या मालवाहू रिक्षास भरधाव कारने धडक दिली. त्यात महेश पंढरीनाथ कोळी (वय २३, रा. रामेश्वर कॉलनी) हा रिक्षाचालक जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी सकाळी साडेआठ वाजता महामार्गावर कालंका माता मंदिराजवळ झाला.
या अपघातात कार व रिक्षा दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी रिक्षाचालकाच्या तक्रारीवरून कारचालक रोहित संजय पालक (रा. विठ्ठलपेठ जळगाव) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महेश पंढरीनाथ कोळी हा तरुण सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे मालवाहू रिक्षाने (एम.एच.१९ सी.वाय.६३७१)पाण्याचे जार पोहोचविण्यासाठी जात असताना कालंकामाता मंदिराजवळ कारने (एम.एच.१९ सी.बी.०५०१) रिक्षास मागून जोरदार धडक दिली. कारच्या धडकेमुळे रिक्षा समोरील वाहनावर धडकली. यात रिक्षाचा समोरील काच फुटला असून नुकसान झाले आहे, तर चालकाच्या पायाला दुखापत झाली आहे. तर जोरदार धडकेने कारमधील एअरबॅग उघडली होती. कारचेही समोरील भागाचे या नुकसान झाले आहे. अपघातानंतर रिक्षाचालक महेश कोळी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील हे करीत आहेत.