चारचाकी वाहनाची सायकलस्वारास धडक, सायकलस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:12 IST2021-07-23T04:12:20+5:302021-07-23T04:12:20+5:30
दुपारी २.१५ च्या सुमारास पाचोरा-जामनेर रोडवरील श्रीकृष्ण नगर भागात हमाली काम करणारा मजूर रमेश राजाराम हटकर (५०, श्रीकृष्ण नगर, ...

चारचाकी वाहनाची सायकलस्वारास धडक, सायकलस्वार ठार
दुपारी २.१५ च्या सुमारास पाचोरा-जामनेर रोडवरील श्रीकृष्ण नगर भागात हमाली काम करणारा मजूर रमेश राजाराम हटकर (५०, श्रीकृष्ण नगर, पाचोरा) हा दुपारच्या वेळी घरी आल्यावर रस्त्याच्या कडेला असलेल्या शौचालयाकडून सायकलवर घराकडे जात असताना पाचोऱ्याहून जामनेरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या टाटा योद्धा कंपनीच्या विनापासिंग गाडीवर (एमएच १४ टीसीजे ३५५) या गाडीच्या चालकाचा ताबा सुटून गाडी इलेक्ट्रिक पोलवर आदळली व पलटी झाली.
यात सायकलवर जाणार रमेश राजाराम हटकर (५०) हा मजूर जागीच ठार झाला. यावेळी चालक अनिल सूर्यकांत बरडे (पिंपरी, नगर) यास तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले. गाडी इलेक्ट्रिक पोलवर आदळल्याने जागीच पलटी झाली अन्यथा पुढे रस्त्याच्या कडेला असलेल्या घरावर धडकली असती तर मोठी प्राणहानी झाली असती. याप्रकरणी पाचोरा पोलिसात नोंद करण्यात आली असून तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलास पाटील करीत आहे. हमाली काम करणारा मजूर रमेश याच्या कुटुंबाची स्थिती हलाखीची असून पश्चात पत्नी, मुली, मुलगा असा परिवार आहे.