मंगरूळ येथून चारचाकी पळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 23:22 IST2019-09-22T23:22:24+5:302019-09-22T23:22:28+5:30
पारोळा : मंगरूळ येथील रहिवासी बाळू सुकलाल पाटील यांच्या मालकीची चारचाकी गाडी (एमएच-१९-एएक्स-३२६०) चोरट्यांनी मंगरूळ येथील घरासमोरून चोरून नेली. ...

मंगरूळ येथून चारचाकी पळवली
पारोळा : मंगरूळ येथील रहिवासी बाळू सुकलाल पाटील यांच्या मालकीची चारचाकी गाडी (एमएच-१९-एएक्स-३२६०) चोरट्यांनी मंगरूळ येथील घरासमोरून चोरून नेली. ही घटना २१ रोजी रात्री घडली.
बाळू पाटील यांनी सकाळी शोधाशोध केली असता गाडी दिसून आली नाही. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला संपर्क करून तपासासाठी कॉन्स्टेबल वानखेडे यांनी घटनास्थळी येऊन चौकशी केली. जवळच्या सीसीटीव्ही कॅमे-यात पाहिले असता चोरटे कासोदा-पारोळा रस्त्याने धुळ्याकडे पसार झाल्याचे समजते. .ा. प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा नोंदविला आहे. तपास विजय भोई करीत आहेत.