रस्त्यावरील खड्ड्यात कोसळली चारचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 22:01 IST2019-12-06T22:01:22+5:302019-12-06T22:01:28+5:30

महामार्गावर अपघात : सुदैवाने जीवित हानी नाही

Four-wheeler crashed into a ditch in the road | रस्त्यावरील खड्ड्यात कोसळली चारचाकी

रस्त्यावरील खड्ड्यात कोसळली चारचाकी


वरणगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर फुलगाव फाट्याजवळ ओव्हरब्रिज उभारणीच्या कामासाठी रस्त्याच्या कडेला खोदण्यात आलेल्या खड्यात चारचाकी (एम एच १५ /डी.सी. १४१९) वाहन कोसळले. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. या अपघातात चालक बचावला असून या घटनेबाबत पोलिसात नोंद नाही. शुक्रवारी हा अपघात झाला.
सध्या महामार्गाच्या चौपदीरकरणाचे काम सुरू असल्याने मूळ रस्ता व आजुबाजूला खोदून ठेवण्यात आले आहे. यामुळे रस्ता अरुंद झाला असल्याने नेहमीच लहान मोठे अपघात होत असतात. याचबरोबर बऱ्याचदा वाहतुकीचाही खोळंबा होत असतो.
एकीकडे रस्ता मोठा होत असल्याचे समाधान असले तरी हे काम सुरू असताना नागरिकांना वाहतूक करताना अधिक त्रास होणार नाही, याची काळजी घेत त्यादृष्टीनेच काम करायला हवे, अशी अपेक्षा आहे. याप्रकरणी संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे व अशी मागणी परिसरातील नागरिक तसेच वाहनधारक यांच्याकडून होत आहे.

Web Title: Four-wheeler crashed into a ditch in the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.