कोगटांसह चौघांना पाच दिवस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:13 IST2021-06-18T04:13:03+5:302021-06-18T04:13:03+5:30
१०० कोटींचा गैरव्यवहार पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या १२ जणांकडील कर्ज व त्यांनी ठेवीदारांचा केलेला विश्वासघात याची रक्कम सुमारे १०० कोटी ...

कोगटांसह चौघांना पाच दिवस कोठडी
१०० कोटींचा गैरव्यवहार
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या १२ जणांकडील कर्ज व त्यांनी ठेवीदारांचा केलेला विश्वासघात याची रक्कम सुमारे १०० कोटी रुपयांपर्यंत आल्याचे आजवरच्या तपासात पुढे आल्याची माहिती तपास सूत्रांनी दिली. पहिल्या कारवाईच्या वेळीही आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने छापेमारीपर्यंत कोणाला याचा सुगावा लागू दिला नाही. त्याचप्रमाणे यावेळीही ही पथके त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर रात्रीच पोहचली होती. एका पथकात १ अधिकारी व ४ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या सर्व पथकांना पुण्यात बसून पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके व त्यांचे सहकारी रात्रभर मार्गदर्शन करत होते.
भंगाळे यांनी कर्जफेड केल्याचा दावा
भागवत भंगाळे यांनी बीएचआरकडून २५ लाख रुपये कर्ज घेतले होते ते नियमानुसार २०१८ मध्ये फेडलेले असून तसा दाखल संस्थेने दिलेला असल्याचे भंगाळे यांचा मुलगा सागर भंगाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.