बोदवड तालुक्यात चार दिवसात चार बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 18:39 IST2021-04-02T18:39:06+5:302021-04-02T18:39:12+5:30
कोरोना : कोल्हाडी ग्रामपंचायतच्या तरुण सदस्याचा मृत्यू

बोदवड तालुक्यात चार दिवसात चार बळी
बोदवड : भय इथले संपत नाही... अशी स्थिती सध्या कोरोनाची तालुक्यात झाली असून गत वर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाने जास्त थैमान माजवण्यास सुरवात केली आहे. गत चार दिवसात चार रुग्णांचा बळी गेला आहे, १ रोजी रात्री तर तीस वर्षीय तरुणाचा बळी गेला असून यात एक बोदवड ,एक मुक्तळ, एक जामठी व एक जण कोल्हाडी येथील आहे.
तालुक्यातील कोल्हाडी येथील ग्रामपंचायत सदस्य असलेल्या उमेश सूर्यवंशी या तीस वर्षीय तरुणाला एक रोजी श्वास घ्याला त्रास होत असल्याने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील इतर रुग्णालयात त्याला हलविण्यासाठी बेडची पाहणी केली. परंतु खासगीही बेड उपलब्ध नसल्याने ग्रामीण रुगणालायातच सदर तरुणाला ठेवण्यात आले असता २ रोजी रात्रीच्या सुमारास त्यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. उमेशच्या पश्चात पत्नी तसेच पाच वर्षीय मुलगा, तीन वर्षीय मुलगी आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.