शौचालयांसाठी चार हजार अर्जाना मंजुरी
By Admin | Updated: October 18, 2015 23:54 IST2015-10-18T23:54:28+5:302015-10-18T23:54:28+5:30
धुळे : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरातून प्राप्त झालेल्या 12 हजार अर्जापैकी 3 हजार 826 अर्ज मंजूर करण्यात आले

शौचालयांसाठी चार हजार अर्जाना मंजुरी
धुळे : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत मनपाला पहिल्या टप्प्यात 1 कोटी 27 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आह़े शहरातून प्राप्त झालेल्या 12 हजार अर्जापैकी 3 हजार 826 अर्ज मंजूर करण्यात आले असून त्यांना करारनामा करण्यासाठी मनपाकडून पत्र दिले जात आह़े पहिल्या टप्प्यात लाभार्थीच्या बँक खात्यात सहा हजार रुपये जमा केले जाणार आहेत़ स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या पाश्र्वभूमीवर मनपातर्फे शहरात शौचालय सव्रेक्षण मोहीम काही दिवसांपूर्वी राबविण्यात आली़ त्यात शहरातील 70 हजार 144 मालमत्ताधारकांपैकी 46 हजार 929 कुटुंबांकडेच वैयक्तिक शौचालय असल्याचे आढळून आले तर 23 हजार 215 कुटुंबीयांकडे शौचालये नसल्याची माहिती समोर आली होती़ वैयक्तिक शौचालयांसाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शासनाकडून लाभार्थीना प्रत्येकी 12 हजार रुपयांची मदत दिली जाणार आह़े वैयक्तिक शौचालये उभारण्यासाठी 12 हजार 248 कुटुंबांनी मनपाकडे अर्ज केले आहेत़ त्यापैकी 3 हजार 826 लाभार्थीना मनपा पत्र देत असून त्यात शौचालय उभारणीसाठी मिळणा:या निधीचा कसा विनियोग करायचा याबाबत मागदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत़ शंभर रुपयांच्या मुद्रांकावर करारनामा केल्यानंतरच शौचालय बांधणीसाठीचा निधी दिला जाणार आह़े शिवाय शौचालयाच्या बांधकामाची माहिती घेऊन दुस:या टप्प्यातील निधी वितरीत केला जाणार असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली़