शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

डॉक्टरला चाकू लावून चौघांनी लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 9:56 PM

मंगरुळ जवळची घटना : मागील एका घटनेची पुनरावृत्ती

अमळनेर : डांगर येथून मोटरसायकलवर अमळनेर येथे येणाऱ्या एका मोटरसायकलस्वार डॉक्टरला चौघांनी चाकू लावून लुटल्याची घटना १९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मंगरूळ गावाजवळ घडली. यावेळी लुटारुंनी वारही केल्याने डॉक्टरच्या हाताला जखम झाली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.वृत्त असे की, डांगर येथील डॉ. शिवदास मखराम राठोड हे १९ रोजी रात्री डांगर कडून अमळनेर येथे येत असताना मंगरूळ येथे सेंट मेरी शाळेच्या जवळ दोन मोटरसायकलवर चार अज्ञात तरुण आले व त्यांनी राठोड यांना थांबवत पेट्रोल पंप कुठे आहे ?असे विचारून त्यांना रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्डयात बळजबरीने नेले. त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायाची बॅग असल्याचे पाहून तरुणांना त्यात भरपूर रक्कम असल्याचा संशय आला. यावेळी त्या तरुणांनी राठोड याना चाकूचा धाक दाखवला आणि हातावर चाकूचा वार केला. यात त्यांच्या हाताला जखम झाली असून त्यांच्या खिश्यातून बळजबरी ७०० रुपये काढून घेतले व मोटरसायकलीने ते लुटारु पळून गेले.राठोड लगेचच उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये आले. घटनेचे वृत्त काळताच एपीआय प्रकाश सदगीर व पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी घटनास्थळी रवाना झाले मात्र आरोपींचा तपास लागू शकला नाही. राठोड यांचा दवाखान्यात जबाब घेऊन अमळनेर पोलीस स्टेशनला चार अज्ञात आरोपींविरुद्ध लूटमार व शस्र कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी करत आहेत. काही दिवसांपूर्वी देखील धुळे रोडवर अशाच पद्धतीने रस्त्यावर अडवून बाजूच्या खड्डयात नेऊन एकाला चाकु लावून लुटण्यात आले होते. या लुटारुंचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.