‘लाटीपाडा’तून मिळणार 4 आवर्तने

By Admin | Updated: November 23, 2015 00:26 IST2015-11-23T00:26:00+5:302015-11-23T00:26:00+5:30

पिंपळनेर : पाटबंधारे विभागाने लाटीपाडा धरणातून या हंगामासाठी चार आवर्तनांद्वारे पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे परिसरातील सुमारे 750 हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.

The four spirits will be available from 'Latipada' | ‘लाटीपाडा’तून मिळणार 4 आवर्तने

‘लाटीपाडा’तून मिळणार 4 आवर्तने

पिंपळनेर : पाटबंधारे विभागाने लाटीपाडा धरणातून शेतक:यांना या हंगामासाठी पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. चार आवर्तनांद्वारे शेतक:यांना पाणी दिले जाणार आहे. यामुळे परिसरातील सुमारे 750 हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.

शेतक:यांना पहिले आवर्तन नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला दिले जाणार आहे. चार आवर्तनांकरिता शेतक:यांना गव्हासाठी हेक्टरी 564 रुपये, हरभ:यासाठी 420 रुपये व कांद्यासाठी 3600 रुपये प्रती हेक्टरी अशी रक्कम अर्जासोबत भरावी लागणार आहे. शेतक:यांच्या मागील थकबाकीवर 12 टक्के व्याज आकारणी करण्यात येणार असल्याची माहितीही विभागाने दिली आहे.

Web Title: The four spirits will be available from 'Latipada'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.