मालमत्तेच्या वादातून चौघा पोलिसांचा धिंगाणा

By Admin | Updated: June 26, 2017 02:34 IST2017-06-26T02:34:18+5:302017-06-26T02:34:18+5:30

मालमत्तेच्या वादातून रामानंद नगर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री वाद घालून शांततेचा भंग केल्याप्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांसह

Four policemen killed in property dispute | मालमत्तेच्या वादातून चौघा पोलिसांचा धिंगाणा

मालमत्तेच्या वादातून चौघा पोलिसांचा धिंगाणा

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मालमत्तेच्या वादातून रामानंद नगर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री वाद घालून शांततेचा भंग केल्याप्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांसह सहा जणांविरुद्ध रविवारी पहाटे गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यामंध्ये हवालदार लालसिंग उदेसिंग पाटील तसेच अरुण लालसिंग पाटील, पांडुरंग उदेसिंग पाटील, चंद्रसिंग पांडुरंग पाटील या पोलीस शिपायांसह आणखी दोघांचा समावेश आहे.
शनिवारी रात्री दहा ते पहाटे तीन वाजेपर्यंत त्यांनी पोलीस ठाण्यात वाद घातला होता. दोन्ही भावांनी एकमेकांना शिव्याची लाखोली वाहत खुर्च्या उचलून एकमेकांना मारण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Four policemen killed in property dispute