अमळनेर, जि.जळगाव : अमळनेर शहरातील पेट्रोल पंचमालक बाबा बोहरी खून प्रकरणातील चार आरोपींविरुद्ध नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १०९९ (मोक्का ) अंतर्गत कारवाई केली असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक रफिक शेख यांनी दिली.३ मे रोजी न्यू प्लॉट भागातील पेट्रोल पंपमालक बाबा बोहरी हे घरी परतताना त्यांच्यावर गावठी पिस्तूलमधून गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती.याप्रकरणी २० मे रोजी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व स्थानिक पोलिसांच्या मदतीने गांधलीपुरा भागातून तन्वीर शेख मुक्तार, तौफिक शेख मुशिरोद्दीन व मुस्तफा शेख महंमद याना अटक केली होती.यात सराईत गुन्हेगार, अट्टल घरफोड्या कैलास रामकृष्ण नवघरे हा मुख्य आरोपी असून त्यानेच पैशांसाठी गोळी झाडल्याचे निष्पन्न झाले होते.एल.सी.बी. व अमळनेर पोलिसांनी २५ मे रोजी घाटकोपर येथून कैलास नवघरे याला अटक केली होती.पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी चारही आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करावी असा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक शेरिंग दोर्जे यांच्याकडे पाठवला होता.१८ रोजी दोर्जे यांनी चारही आरोपींना मोक्का लावला असून तपास डी. वाय. एस. पी. रफीक शेख यांच्याकडे दिला आहे. चौघा आरोपींना आता गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत बाहेर पडता येणार येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.बोहरी यांच्या खुनाच्या १७ दिवसानंतर या आरोपींना अटक करण्यात आली होती. या सर्वांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.
अमळनेरातील चार जणांना मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:02 IST