शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या पोलिसाला जळगावात मारहाण करुन चौघांनी लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 12:32 IST

दोघांना अटक

ठळक मुद्देममुराबाद रस्त्यावर अपघातावरुन झाला वाद जबरी चोरीचा गुन्हा दाखल

जळगाव : दिवाळीच्या सुटीनिमित्त घरी आलेल्या पंकज दिनकर सोनवणे (वय ३२, रा.डोंबिवली जि.ठाणे, ह.मु.ममुराबाद, ता.जळगाव) या पोलिसाला अपघात झाल्यानंतर चौघांनी मारहाण करुन लुटल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणे आठ वाजता ममुराबाद कृषी संशोधन केंद्राजवळ घडली. याप्रकरणी जबरी लुटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर केशव संतोष सपकाळे (वय २७, रा.धामणगाव, ता.जळगाव) व योगेश गोपीचंद सपकाळे (वय ३२, रा.नांद्रा, ता.जळगाव) या दोघांना अटक झाली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबई वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पंकज सोनवणे हे दिवाळीनिमित्त ममुराबाद येथे आई व वडीलांना भेटण्यासाठी आले होते.जळगाव पोलीस लाईनमध्ये वास्तव्याला असलेला भाऊ दीपक यांना ८ नोव्हेंबर रोजी भेटण्यासाठी पंकज शहरात आले होते. मात्र भावाची भेट न झाल्याने दुचाकीने (क्र.एम.एच.१९ जी.३९९९) ममुराबाद येथे परत जात असताना कृषी संशोधन केंद्राजवळ समोर येणाऱ्या कारला ओव्हरटेक करुन एक दुचाकीस्वार वेगात आला व त्यामुळे पंकज यांच्या दुचाकीला धडक बसली. त्यात दोन्ही दुचाकीस्वार खाली कोसळले. यावेळी तेथे जमलेल्या केशव संतोष सपकाळे, विकास सदाशिस नन्नवरे, किसन नन्नवरे व योगेश गोपीचंद सपकाळे चौघांनी पंकज यांना मारहाण करायला सुरुवात केली.दरम्यान, अटकेतील दोघांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्या.एम.एम.चौधरी यांनी १३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड.अविनाश पाटील यांनी तर बचाव पक्षातर्फे अ‍ॅड.कुणाल पवार यांनी काम पाहिले.कारमध्ये मारहाण करुन लुटलेदोन्ही दुचाकीवरील जखमींना रुग्णालयात नेण्याच्या नावाखाली चौघांच्या मित्राच्या कारमध्ये टाकून पंकज यांना चौघांनी पुन्हा मारहाण केली. यावेळी खिशातील ४८ हजार रुपये रोख, ५० हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोन्याची साखळी व दहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी काढून घेतली. या चौघांना वाहन शहर पोलीस स्टेशनला नेण्याचे सांगितले असता, त्यांनी पुन्हा त्याच जागेवर सोडून पलायन केले, नंतर मित्र मनोज पाटील याला बोलावून तालुका पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव