लासूर येथे सचिवाने घातला चार लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 06:25 PM2018-04-26T18:25:29+5:302018-04-26T18:25:29+5:30

चोपडा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Four lakhs of rupees spent by the secretary in Lusur | लासूर येथे सचिवाने घातला चार लाखांचा गंडा

लासूर येथे सचिवाने घातला चार लाखांचा गंडा

Next
ठळक मुद्देसचिवाने पैसे घेतले मात्र केला नाही भरणासहायक निबंधकानी दिले गुन्हा दाखल करण्याचे निर्देशगुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित सचिव फरार

आॅनलाईन लोकमत
चोपडा, दि.२६ : तालुक्यातील लासुर येथील विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव मोहनकुमार गंगाधर पवार याने शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा म्हणून भरलेले ४ लाख ९ हजार रुपये घेऊन पोबारा केला. महिना लोटला तरी तो कामावर रुजू झाला नाही अथवा पैसेही भरले नाहीत म्हणून त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
लासुर विविध कार्यकारी सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या सचिवपदी मोहनकुमार गंगाधर पवार (रा.पातोंडा ता. अमळनेर) यांची जिल्हा देखरेख संघाकडून पातोंडा वि.का.संस्थेवर नेमणूक करण्यात आली होती. मार्च अखेर आपणा कडील असलेली बाकी भरली तर कर्जमाफी योजनेअंतर्गत दीड लाख रुपये माफ होतील म्हणून शेतकºयांनी रोख रकमेचा भरणा लासूर विविध कार्यकारी सोसायटीत जाऊन आपल्या कर्ज खात्यात केला.
पैसे घेतले मात्र भरणा नाही
दि २८ मार्च रोजी काही शेतकºयांनी लिपिक बापू ठाकूर यांचेकडून भरणा पावती घेतली. त्या भरणा पावतीवर सचिव मोहनकुमार पवार यांनी स्वाक्षरी करीत पैसे ताब्यात घेतले. मात्र त्याचा भरणा जिल्हा बँकेत न करता ती रोख रक्कम घेवून सचिवाने पोबारा केला.
संस्थेंची तक्रार
याबाबत संस्थेने सहायक निबंधकाना पत्रव्यवहार केला. त्यांनी सदर सचिवावर संस्थेने गुन्हा दाखल करण्याचे सुचविले.
याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये चेअरमन पितांबर शामराव कोळी रा. लासुर यांच्या फियार्दीवरून सचिव मोहनकुमार गंगाधर पवार याचे विरुद्ध भाग ५ गुन्हा राजिस्टर क्रमांक ३०/ १८ भादवी ४२०, ४०६, ४०८, ४०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भिमराव नंदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नाना दाभाडे हे करीत आहेत.

Web Title: Four lakhs of rupees spent by the secretary in Lusur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.