अमळनेरात चार लाखाचा गुटखा जप्त

By Admin | Updated: July 6, 2017 17:22 IST2017-07-06T17:22:33+5:302017-07-06T17:22:33+5:30

तीन वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी छापे

Four lakhs of gutka seized | अमळनेरात चार लाखाचा गुटखा जप्त

अमळनेरात चार लाखाचा गुटखा जप्त

ऑनलाईन लोकमत

अमळनेर, दि.6 - येथे  नाशिक, जळगाव व  धुळे येथील अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने तीन वेगवेगळ्या ठिकाणी गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास एकाचवेळी छापा टाकत चार लाख 15 हजार 202 रूपयांचा गुटखा जप्त केला. गुटख्यावर बंदी आल्यापासून अमळनेरात ही पहिलीच मोठी कारवाई ाहे.
शहरात गुटखा विक्री होत असल्याची माहिती अन्न सुरक्षा  विभागाच्या अधिका:यांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आली. स्टेशनरोडवरील आययुडीपी शॉपिंग कॉम्प्लेक्समधील एका गाळ्यातून तीन लाख 33 हजार, प्रकाश वाधवानी चोपडा रोड यांच्याकडून 31 हजार 335 रूपये व गोकूळ पाटील पैलाड यांच्याकडून 50 हजार 867 असा एकूण चार लाख 15 हजार 202 रूपयांचा  गुटखा जप्त केला. 
ही कारवाई अन्न सुरक्षा विभागाचे सहआयुक्त उदय वंजारी व सहआयुक्त लक्ष्मण दराडे (धुळे) यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अनिल गुजर, दिलीप सोनवणे संदीप देवरे (जळगांव),  प्रमोद पाटील, गुलाब वसावे (नाशिक), अनंत पवार दिनेश तांबोळी(धुळे),  गोविंद चावडा ( शिरपूर) यांच्या पथकाने केली आहे. 

Web Title: Four lakhs of gutka seized