चारचाकींची धडक;एक ठार, सहा जखमी

By Admin | Updated: December 31, 2015 00:07 IST2015-12-31T00:07:22+5:302015-12-31T00:07:22+5:30

यावल- चोपडा रस्त्यावर वढोदा गावाजवळ दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अनिल हरिभाऊ ताटे (वय 42 रा. चापोरा, ब:हाणपूर) हे ठार झाले.

Four killed, one killed, six injured | चारचाकींची धडक;एक ठार, सहा जखमी

चारचाकींची धडक;एक ठार, सहा जखमी

दहीगाव,ता.यावल : यावल- चोपडा रस्त्यावर वढोदा गावाजवळ दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अनिल हरिभाऊ ताटे (वय 42 रा. चापोरा, ब:हाणपूर) हे ठार झाले. अन्य सहा जण जखमी झाले. त्यातील चार गंभीर आहेत. त्यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार करून जळगावच्या सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना 30 रोजी सकाळी साडेसात वाजता घडली. यावलहून चोपडय़ाकडे जाणारी चारचाकी व चोपडय़ाकडून ब:हाणपूरकडे जाणारी दुसरी चारचाकी यांची वढोदा गावाजवळ समोरासमोर धडक झाली. यात मॉरिशस येथील बोहरा कुटुंबातील मुनीरा फक्रोद्दीन आदमजी (वय 44) यांच्या डोक्याला व पाठीला जबर मार लागला. खैरुनिसा आदमजी (वय 60) यांच्या तोंडाला दुखापत होऊन उजवा हात फ्रॅर झाला. सकीना फक्रोद्दीन आदमजी (वय 12), अफजल अली चालक आणि फक्रोद्दीन आदमजी (वय 47) हे किरकोळ जखमी झाले. दुस:या चारचाकीवरील अनिल पंडित महाजन (रा.ब:हाणपूर), अनिल हरिभाऊ ताटे (चापोरा,ता.ब:हाणपूर) हे गंभीर जखमी झाले. यातील ताटे यांचे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ते ब:हाणपूरहून नांद्रा ता. जळगाव येथे जात होते तर बोहरा कुटुंब ब:हाणपूर येथे जात होते. याबाबत कॉन्स्टेबल शाका तडवी यांच्या फिर्यादीवरून चार चाकी क्र. एमपी 68/3333 व दुसरी चारचाकी क्र. एमएच 04/2829 यांचे पंचनामे करून नोंद घेण्यात आली. फौजदार आर. एन.पगारे व हेड कॉन्स्टेबल पांडुरंग सपकाळे, सुनील पाटील तपास करीत आहेत.

(वार्ताहर)

Web Title: Four killed, one killed, six injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.