जळगाव- शहापुर गावाजवळ गुरूवारी सायंकाळी ७़३० वाजता दोन रिक्षांची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली़ या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे़ सचिन भीमराव खरात (वय-२१), नर्मदा भीमराव खरात, नगाबाई नामदेव खरात (वय-६५, सर्व रा़ चिंचखेडा तवा, ता़ जामनेर) व सुमन दीपक दांडगे (वय-२७, रा़ गोद्री) अशी चौघा जखमींची नावे आहेत़सचिन हे बहिण सुमन, आई नर्मदा तसेच आजी नगाबाई यांच्यासोबत गुरूवारी दुपारी जामनेर येथे बाजार करण्यासाठी गेले होते़ संध्याकाळी बाजार करून झाल्यावर चौघे एका रिक्षातून घरी जाण्यासाठी निघाले़ दरम्यान, शहापुर गावाच्या पुढे समोरून येणाऱ्या रिक्षाने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली़ यात रिक्षा पलटी होऊन त्यातील चौघे गंभीर जखमी झाले़
शहापूरजवळ रिक्षांच्या धडकेत चार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 19:53 IST
शहापुर गावाजवळ गुरूवारी सायंकाळी ७़३० वाजता दोन रिक्षांची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली़ या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले.
शहापूरजवळ रिक्षांच्या धडकेत चार जखमी
ठळक मुद्देजखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरूसर्व जखमी एकाच कुटुंबातीलरिक्षाने धडक दिल्यानंतर समोरील रिक्षा झाली पलटी