चार एक्सप्रेस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:36 IST2017-08-26T00:34:04+5:302017-08-26T00:36:50+5:30

पंजाबातील तणाव : काही गाड्या दिल्लीपर्यंत

Four Express Cancel | चार एक्सप्रेस रद्द

चार एक्सप्रेस रद्द

ठळक मुद्देगुरमीत राम रहीम सिंह यांना दोषी ठरविल्याने तणावप्रवाशाचे मात्र हालजम्मूतवी-पुणे झेलम एक्स्प्रेस व फिरोजपूर-मुंबई पंजाब मेल रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : पंजाबसह हरियाणातील तणावग्रस्त परिस्थितीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने या भागातून धावणाºया १२१३८ अप फिरोजपूर-मुंबई पंजाब मेल व ११०७८ अप जम्मूतवी-पुणे झेलम एक्स्प्रेससह चार रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत.
डेरा सच्चा सौदाप्रमुख गुरमीत राम रहीम सिंह यांना पंचकुला (हरियाणा) सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवले. २८ आॅगस्ट रोजी शिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर डेरा समर्थक संतप्त झाले आहेत. या दोन्ही राज्यातील तणावाची स्थिती लक्षात घेता २५ रोजी जम्मूवरून सुटणारी ११०७८ अप जम्मूतवी-पुणे झेलम एक्स्प्रेस, शिवाय फिरोजपूर येथून याच दिवशी सुटणारी अप १२१३८ फिरोजपूर-मुंबई पंजाब मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच २६ रोजी निघणारी २२४५५ शिर्डी-कालका ही गाडी व मुंबईहून निघणारी ११०५७ मुंबई-अमृतसर पठाणकोट एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
दोन गाड्या धावणार दिल्लीपर्यंत
शुक्रवारी रात्री मुंबई येथून निघणाºया १२१३७ मुंबई-फिरोजपूर पंजाब मेल एक्स्प्रेस व ११०७७ पुणे-जम्मूतवी झेलम एक्स्प्रेस या गाड्या दिल्लीपर्यंतच धावणार असल्याचे सूत्रांनी कळविले.

Web Title: Four Express Cancel