जि.प.सह चार विभागाची ‘एनओसी’!
By Admin | Updated: October 31, 2015 00:12 IST2015-10-31T00:12:41+5:302015-10-31T00:12:41+5:30
धुळे : महापालिकेच्या पवन ऊर्जा प्रकल्पासाठी सततच्या पाठपुराव्यानंतर लघुपाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद आणि भूमि अभिलेख या चार विभागाने ना हरकत दाखला दिला आहे.

जि.प.सह चार विभागाची ‘एनओसी’!
धुळे : महापालिकेच्या पवन ऊर्जा प्रकल्पाचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आह़े सततच्या पाठपुराव्यानंतर लघुपाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद आणि भूमि अभिलेख या चार विभागाने एनओसी अर्थात ना हरकत दाखला दिला आहे, अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली. दरम्यान, रखडलेल्या प्रकल्पाच्या कामाला आता काहीअंशी चालना मिळाली़ प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा यासाठी यंत्रणेने आता तातडीने पाऊल उचलण्याची गरज व्यक्त होत आह़े जकात व पारगमन शुल्क बंद झाल्याने महापालिकेचे 69 कोटींचे आर्थिक उत्पन्न बंद झाले आहे. त्याचा परिणाम विकासकामांसह कर्मचारी वेतनावर झाला आह़े दैनंदिन खर्च पाहता आणि उत्पन्न तुटपुंजे असल्याने महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी चिंतेत आह़े एलबीटीवर महापालिकेची मदार होती़ ती पण आता बंद झाली आह़े जे काही आहे ते आता मालमत्ता कराच्या वसुलीवर अवलंबून आह़े त्यातून काहीसा दिलासा मिळणार असलातरी हा प्रश्न सुटणार नाही, अशी स्थिती आह़े तापी व अन्य जलस्त्रोतांतील पाणीपुरवठा योजनेचे वार्षिक 14 कोटींचे वीज बिल भरणे शक्य होणार आह़े याशिवाय अक्कलपाडा ते नकाणे तलाव पाणीपुरवठा योजना प्रस्तावित आहे, ती पूर्ण झाली तर 60 लाखांच्या निधीची बचत होऊ शकेल़ त्याचप्रमाणे पवन ऊर्जा प्रकल्प मार्गी लागला तर वीज बिलात दरमहा 40 लाख रुपयांची बचत होऊ शकेल असा विश्वास महापालिका प्रशासनाला आह़े कामातील उदासीनता गेल्या दोन वर्षापासून केवळ कागदोपत्री पाठपुरावा अगदी नावाला सुरू असल्याचे चित्र आह़े अद्यापर्पयत ठोस कोणतेही पाऊल याबाबत उचलण्यात आलेले नाही़ पवन ऊर्जा प्रकल्पाबाबतचा संपूर्ण अहवाल तयार होणे गरजेचे आह़े प्रकल्प पूर्ण होत असताना एकत्रित किती खर्च अपेक्षित आहे, याची माहिती गोळा करण्याचे काम सुरूच आह़े या प्रकल्पासाठी उद्योग आणि ऊर्जा विभागाची मान्यता गरजेची आह़े त्यासाठीही पाठपुरावा होत आह़े जागेचा मोजणी नकाशा असायला हवा़ ज्याठिकाणी हा प्रकल्प उभारला जाणार आहे, त्या जागेवर पोहोच रस्ता उपलब्ध करून द्यायला हवा़ उच्च वीज वाहिनीजवळ रस्ता झाला पाहिजे, यदाकदाचित तो नसल्यास रस्ता तातडीने करून द्यायला हवा़ या अनुषंगाने निर्माण होणा:या विविध बाबींवर वेळीच प्रकाशझोत टाकायला हवा़ पण, याबाबतीत केवळ उदासीनता असल्याचे म्हणावे लागेल़ पूर्ततेसाठी मनपाला दोन वर्षाचा काळ लागला यावरून उदासीनता जाणवत आह़े प्रकल्प आठ कोटींचा महापालिकेचा पवन ऊर्जा प्रकल्प हा सुमारे 8 कोटींचा आह़े त्यातून 4 मेगाव्ॉट वीजनिर्मिती होऊ शकेल़ हा प्रकल्प साक्री तालुक्यातील टिटाणे शिवारात प्रस्तावित आह़े त्यासाठी एकत्रित 4 एकर जागा लागणार आह़े ती हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत काही त्रुटी महसूल विभागाने काढल्या होत्या़ त्याची पूर्तता करण्याचे महापालिकेला सूचित करण्यात आले होत़े त्यासाठी प्रशासनाला बरीच कसरत करावी लागत आह़े लोकप्रतिनिधी आणि अधिका:यांनी समन्वयाने प्रयत्न केले तर त्याचा लाभ पर्यायाने महापालिकेला होणार आह़े