बलात्कारप्रकरणी परवेजला 4 दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2017 12:34 IST2017-07-03T12:34:03+5:302017-07-03T12:34:03+5:30

फौजदार पिता फरारच : संभाषणाची सीडी न्यायालयात सादर

Four days police custody for Parvez in rape case | बलात्कारप्रकरणी परवेजला 4 दिवसांची पोलीस कोठडी

बलात्कारप्रकरणी परवेजला 4 दिवसांची पोलीस कोठडी

 ऑनलाईन लोकमत

जळगाव ,दि.3 - लगAाचे आमिष दाखवून 24 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणा:या परवेज शेख रईस शेख या पोलीस कर्मचा:याला रविवारी न्यायालयाने 6 जुलैर्पयत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, याच गुन्ह्यातील दुसरा आरोपी परवेजचा पिता फौजदार रईस शेख अब्दुल शेख हा फरार असून, पोलिसांना त्यास अटक करण्यात अद्याप यश आलेले नाही.
परवेज शेख याने एका तरुणीवर लगAाचे आमिष दाखवून सतत पाच वर्ष बलात्कार केला, तर त्याचा फौजदार पिता रईस शेख याने पीडित तरुणीला धमकी देत तिच्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी जिल्हा सत्र न्यायालयाने दोघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. अटकेच्या भीतीने पिता-पुत्र न्यायालयातच आले नव्हते. त्यानंतर सायंकाळी परवेज शेख याला उस्मानिया पार्कमधून अटक करण्यात आली. तपासाधिकारी सुनील गायकवाड यांनी रविवारी त्याला न्या.प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर केले.
 

Web Title: Four days police custody for Parvez in rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.