मुक्ताईनगर येथे अवैध बायोडिझेल विक्रीप्रकरणी चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:19 IST2021-09-21T04:19:41+5:302021-09-21T04:19:41+5:30
तालुक्यात अवैधरीत्या बायोडिझेल विक्री केल्याप्रकरणी पुरवठा निरीक्षक यांच्या तक्रारीवरून चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ऋषिकेश तानाजी ...

मुक्ताईनगर येथे अवैध बायोडिझेल विक्रीप्रकरणी चौघांवर गुन्हा
तालुक्यात अवैधरीत्या बायोडिझेल विक्री केल्याप्रकरणी पुरवठा निरीक्षक यांच्या तक्रारीवरून चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ऋषिकेश तानाजी गावडे (पुरवठा निरीक्षक मुक्ताईनगर) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दिनांक १९ रोजी रात्री सव्वा वाजता पूरनाड शेती शिवारातील जागेवर झुलेलाल बायोडिझेल नावाने अवैधरीत्या डिझेलची विक्री केली जात होती. मुक्ताई टोल काट्याचे जागामालक राजेंद्र सीताराम वागले रा. शहापूर यांनी नीलेश युवराज सपकाळे यास बायोडिझेल विक्रीसाठी जागा वापरण्याकरता दिली आहे. नीलेश सपकाळे यांचे सांगण्यावरून आरोपी रितेश नारायणदास दोरताणी व चिराग गोपाळ शिराठ हे ट्रकचालक मकसूद शफीक अहमद यांच्या ट्रकमध्ये मशीनद्वारे हे डिझेल टाकताना आढळून आले. चार लाख ९ हजार ४७० रुपये रोख व पत्री टाकीमध्ये सहा लाख ६६ हजार रुपये किमतीचे अंदाजे ९ हजार लिटर ज्वलनशील बायोडिझेल पदार्थाची साठवणूक व काळाबाजार करून विक्री करताना आढळून आल्याने आरोपी नीलेश युवराज सपकाळे रा. निसर्ग कॉलनी मोहन टॉकीजजवळ आसोदा रोड, जळगाव, राजेंद्र सीताराम वाघले रा. शहापूर, प्रीतेश नारायनदास दोरताणी, पोस्ट ऑफिस कॅम्प झुलेलाल मंदिराजवळ, परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती आणि चिराग गोपाळ शिराठ रा. निसर्ग कॉलनी, आसोदा रोड, जळगाव या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ करत आहेत.