चाळीसगावात एकाचा उष्माघाताने मृत्यू

By admin | Published: May 19, 2017 01:20 AM2017-05-19T01:20:28+5:302017-05-19T01:20:28+5:30

चक्कर आल्याने घडली घटना : पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

The fossil death of one in forty | चाळीसगावात एकाचा उष्माघाताने मृत्यू

चाळीसगावात एकाचा उष्माघाताने मृत्यू

Next

चाळीसगाव : शहरातील अफूगल्लीतील  प्रौढ इसमाचा   चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. उष्माघाताने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.
 या घटनेबाबत माहिती अशी की, नागद रोडलगत एक अनोळखी इसम  पडून असल्याचे लक्षात येताच त्याला  ग्रामीण रुग्णालयात 17 रोजी रात्री 8 वाजेच्या दरम्यान उपचारार्थ दाखल करण्यात आले. तथापि वैद्यकीय अधिका:यांनी त्याला मयत घोषित केले. तपासाअंती सदर इसमाची ओळख पटली असून त्याचे नाव भास्कर गुलाबराव जाधव (वय 50, रा.अफूगल्ली) असे आहे. उष्माघाताचा त्रास झाल्याने तो रस्त्यावर पडून होता. त्यात त्याचा मृत्यू झाला असल्याची परिसरात चर्चा आहे.  शहर पोलिसात 18 रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.कॉ. मिलिंद शिंदे करीत आहे.

Web Title: The fossil death of one in forty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.