उष्माघाताने इसमाचा मृत्यू
By Admin | Updated: May 16, 2017 18:28 IST2017-05-16T18:28:22+5:302017-05-16T18:28:22+5:30
अमरसिंग पाटील यांना सोमवारी मळमळ, उलटय़ांचा त्रास झाल्याने ग्रामीण रुग्णालयात

उष्माघाताने इसमाचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
यावल, जि. जळगाव, दि. 16 - जामनेर तालुक्यातील चिंचोली-पिंप्री येथील रहिवासी अमरसिंग रामसिंग पाटील या 55 वर्षीय इसमाचा उष्माघाताने यावल ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला.
अमरसिंग पाटील यांना सोमवारी मळमळ, उलटय़ांचा त्रास झाल्याने ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर डॉ. स्वप्नील पाटील व सहका:यांनी औधधोपचार केले. उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांचे निधन झाले. या बाबत चिंचोलीचे सरपंच विनोद चौधरी यांनी सांगितले की, गेल्या 15 दिवसांपासून अमरसिंग हे रोझोदा ता. रावेर येथे विहीर खोदण्याच्या कामासाठी आले होतो. या बाबत डॉ. स्वप्नील पाटील यांच्या खबरीवरून पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.