शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
3
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
4
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
5
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
6
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
7
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
8
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
10
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
11
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
12
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
13
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

चाळीसगावच्या ‘त्या’ म्हणतात, ‘रडायचं नाही, आता लढायचं...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 1:12 AM

त्या सुई-दोºयाची अशी किमया साधलीय चाळीसगाव येथील ‘उद्योगिनी परिवारातील’ २३ महिलांच्या ४६ हातांनी. त्यांच्या डोळ्यात आता अश्रुंऐवजी परिस्थितीला हरविण्याचा एल्गार आहे.

ठळक मुद्देमहिला दिन विशेष सुई दोऱ्याने सांधले परिस्थितीला२३ जणी झाल्या कुटुंबाच्या कर्त्या

जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव :‘सुई - दोरा, टाका हसरासंघषार्ची वाट हीच खरीध्येय ठेऊनी सरळधाव घ्यावी पैलतिरी...’त्या सुई-दोºयाची अशी किमया साधलीय चाळीसगाव येथील ‘उद्योगिनी परिवारातील’ २३ महिलांच्या ४६ हातांनी. त्यांच्या डोळ्यात आता अश्रुंऐवजी परिस्थितीला हरविण्याचा एल्गार आहे. मिळून २३ महिलांनी आपल्या फाटक्या परिस्थितीला सांधलेय. आपल्या कुटुंंबासाठी त्या ‘सुखाचा धागा’ झाल्या आहेत. त्यांचा उंच झोका महिला दिनी म्हणूनच आदर्श ठरतो.२०१७ मध्ये तीन वर्षांपूर्वी महिला उद्योगिनी उपक्रमाचे चाक फिरले. हाती होते फक्त सुई-दोरा आणि पायाखाली शिलाई मशिनचे पायडल. मात्र तीन वर्षात या महिलांच्या आयुष्यात जगण्याची नवी उमेद भरलीय. त्या आता कुटुंंबाच्या 'कर्त्या' झाल्या आहेत. प्रत्येकीलाच वैयक्तिक आयुष्यात मोठा संघर्ष करावा लागला आहे. तथापि, संकटांच्या छातीवर दमदारपणे पाय रोवून त्यांनी 'नई उडान' घेतली आहे. कुटुंंबातील मुलांचे शिक्षण असो की वयोवृद्धांचे आजार यांना 'ती'च्या कमाईचा आधार मिळालाय. २३ कुटुंंबे पुन्हा नव्याने उभी राहिली आहेत. आनंदून गेली आहे.फिरत्या चाकावरती मिळे कापडाला आकारचाळीसगाव शहरातील भडगाव रोडलगतच्या कैलास नगरातील गजानन कंस्ट्रक्शनमध्ये उद्योगिनी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. उद्योगिनीमध्ये दाखल होण्यासाठी 'गरजू' ही मुख्य अट आहे. महिलांना एक महिना मोफत प्रशिक्षण देऊन शिलाई मशिनवरील कामे दिली जातात. प्रशिक्षणाच्या काळातही तीन हजार रुपये प्रति महिना वेतन दिले जाते. यानंतर दिवसभरात शिवण कामानुसार मोबदला दिला जातो. सध्या उद्योगिनी प्रकल्पात काम करणाºया बहुतांशी महिला विधवा, परितक्त्या, कौटुंबिक समस्यांना झुंज देणाºया आहेत. उद्योगिनी प्रकल्पात महिलांना स्वावलंबी बनविले जाते. त्यांना शिवण कामाची कामे देऊन मोबदला दिला जातो. सकाळी १० ते सायंकाळी सहापर्र्यंत त्या कामे करतात.मदत नको, कामे द्या!आत्मविश्वासाने परिस्थितीला हरवत २३ महिलांनी आपल्या सैरभैर झालेल्या कुटुंंबाला सावरले आहे. काहींनी पतीच्या निधनानंतर थेट परिवाराची जबाबदारी खांद्यावर घेतलीय. काहींनी आपले दु:ख उगाळत बसण्याऐवजी सुखाचे पदर विणले आहेत. मुलांची थांबलेली शिक्षण वारी सरू करून काहींनी 'हम लढेंगे' हाच मत्र दिला आहे. काहींनी उपवर मुला - मुलींची लग्ने लावून आपले कर्तेपण सिद्ध केले. आम्हाला मदत नको तर हातांना कामे द्या, असं या महिला आवर्जुन सांगतात. उद्योगिनी झालेल्या महिलांच्या मुलांचा गुणगौरव सभारंभ, वाढदिवस, दरदिवशी प्रार्थना. त्यांच्या दिवसाचे वेळापत्रक असे पुढे सरकते. शिलाई मशिनचे चाक फिरत असते आणि उद्योगिनीनींचे आयुष्य पुढे सरकत असते.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनChalisgaonचाळीसगाव