चाळीसगाव : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व हरीत क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त २९ रोजी आभिवादनपर जनजागृती मोटार सायकल महारॅली काढण्यात आली. या रॅलीत ७०० पेक्षा जास्त मोटार सायकसह सुमारे २ हजार युवक सहभागी झाले होते.भारतीय बहुजन क्रांती दल पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग राठोड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी, कष्टकरी, वंचित बहुजन समाज जागर भव्य मोटार सायकल महा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.घाट रोड, विठ्ठल सभागृह येथे रॅलची सुरवात करण्या अगोदर सभा झाली. डॉ. मोरसिंग राठोड, यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बहुजन वंचित आघाडीचे तालुका अध्यक्ष संभा जाधव, बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश जाधव, डॉ, तुषार राठोड, भारतीय बहुजन क्रांती दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.समारोपप्रसंगी खान्देश प्रांत अध्यक्ष ईश्वर राठोड, तालुका अध्यक्ष, संजय राठोड, उपाध्यक्ष विलास राठोड, जिल्हा उपाध्यक्ष रतन जाधव , माजी सरपंच नरेंद्र पवार, शहराध्यक्ष गंगाराम राठोड, उपाध्यक्ष राजाराम सोनार, श्रावण पांचाळ, मुकेश नेतकर, मेघराज जाधव, सुनिल राठोड, आदी पदाधिकारी उपस्थित होते.रॅलीद्वारे शेतकरी आत्महत्या करु नये यासाठी जनजागृती व हमीभावासाठी संगठण, तरुणांच्या हातास काम व व्यसनमुक्ती, विविध हक्क आदी विषयी जागृती करण्यात आली.
चाळीसगावी मोटारसायकल महारॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 16:22 IST