माजी कुलगुरू प्रा. डॉ.सुधीर मेश्राम कालवश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:16 IST2021-03-16T04:16:49+5:302021-03-16T04:16:49+5:30

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.डॉ. सुधीर मेश्राम (६५)यांचे सोमवारी नागपूर येथील खासगी रुग्णालयात ...

Former Vice Chancellor Pvt. Dr. Sudhir Meshram passed away | माजी कुलगुरू प्रा. डॉ.सुधीर मेश्राम कालवश

माजी कुलगुरू प्रा. डॉ.सुधीर मेश्राम कालवश

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.डॉ. सुधीर मेश्राम (६५)यांचे सोमवारी नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.

अमरावती येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मायक्रो-बायोलॉजीत एम.एस्सी. आणि नंतर पीएच.डी. पूर्ण केली. ते नागपूर विद्यापीठातील मायक्रो बायोलॉजी विषयाचे विभागप्रमुख होते. त्यांनी या विषयात सखोल संशोधन केले होते. त्यांचे अनेक रिसर्च पेपर्स आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिध्द झाले होते. तर त्यांनी आपल्या संशोधनाचे काही पेटंटसुध्दा मिळविले होते. त्यानंतर ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू पदावर रुजू झाले होते. त्यांच्या काळात विद्यापीठात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. यात प्रामुख्याने प्रयोगशाळा ते जमीन हा प्रयोग देशपातळीवर पोहोचला होता.

Web Title: Former Vice Chancellor Pvt. Dr. Sudhir Meshram passed away