माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील धुळ्यात अतिदक्षता विभागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 20:19 IST2019-04-11T20:18:09+5:302019-04-11T20:19:48+5:30
मारहाण प्रकरण: भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ व समर्थकांना अटक व सुटका

माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील धुळ्यात अतिदक्षता विभागात
अमळनेर : उदय वाघ व समर्थकांकडून मारहाण झालेले भाजपचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना धुळ्यातील खाजगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्याात आले आहे. या प्रकरणी बुधवारी रात्रीच भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह ७ जणांना अटक करून जामिनावर सोडण्यात आले.
या मारहाणीत बी एस पाटील यांच्या नाकाचे हाड मोडले आणि लिव्हरला सूजही आली आहे. बुधवारी सायंकाळी भाजपच्या महायुतीच्या मेळाव्यात दोन मंत्र्यांसमक्ष भर मेळाव्यात भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ व त्यांच्या ६ कार्यकर्त्यांनी डॉ. पाटील यांना जबर मारहाण केल्यानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यांना जबर मार लागलेला आढळून आल्याने त्यांना रात्रीच तातडीने धुळे येथील सिद्धेश्वर रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. डॉ. पाटील यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या नाकात रक्ताच्या गुठळ्या झाल्या असून नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे तर पोटाला मार बसल्याने लिव्हरला सूज आल्याचे व छातीला मुक्का मार लागल्याचे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले असल्याची माहिती त्यांचे शालक डॉ. चंद्रकांत पाटील यांनी दिली.
दरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ , शहराध्यक्ष शीतल देशममुख , राजेश वाघ , पंकज पवार , संदीप वाघ , देवा लांडगे , ऐयाज बागवान यांना पोलिसांनी रात्रीच अटक करून लगेच जामिनावर सोडले.