शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार चौधरी यांना अंतरिम अटकपूर्व जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 23:37 IST

मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना धमकी दिल्याप्रकरणी माजी आमदार संतोष चौधरी यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनपा मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना धमकी दिल्याचे प्रकरण.

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ : नपा मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना धमकी दिल्याप्रकरणी माजी आमदार संतोष चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. यात त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

शहरातील सर्वोदय छात्रालयातील बांधकामावरून मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व चौधरी यांच्यात वाद झाला होता. तसेच चौधरी यांनी मुख्याधिकाऱ्यांना धमकी दिली होती. यावेळी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौधरी यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता. ही घटना १४ जून रोजी घडली होती.

यानंतर चौधरी यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर शनिवारी कामकाज होऊन त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. त्यांच्या जामीन अर्जावर आता २२ रोजी सुनावणी होणार आहे. यानंतर रविवारी बाजारपेठ पोलीस स्थानकात हजर होत चौधरी यांनी आपला जबाब नोंदविला. त्यांच्यासमवेत ॲड. जगदीश कापडे, बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी, आशिक खान, सतीश घुल, दुर्गेश ठाकूर उपस्थित होते.

माजी आमदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी जिल्ह्यातील मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदने देखील दिले होते.

आपण मुख्याधिकाऱ्यांना ओळखत नाही, त्यांना अद्याप पाहिले सुद्धा नाही, आगामी निवडणुका पाहता राजकीय रंग असलेला हा गुन्हा आहे. अशा खोट्या गुन्हांना आपण घाबरत नाही. त्यामुळे नो चिंता.

- संतोष चौधरी, माजी आमदार.

टॅग्स :JalgaonजळगावBhusawalभुसावळCrime Newsगुन्हेगारी