माजी आमदार चौधरी यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:13 IST2021-06-21T04:13:28+5:302021-06-21T04:13:28+5:30
भुसावळ : नपा मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना धमकी दिल्याप्रकरणी माजी आमदार संतोष चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. ...

माजी आमदार चौधरी यांना
भुसावळ : नपा मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना धमकी दिल्याप्रकरणी माजी आमदार संतोष चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. यात त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
शहरातील सर्वोदय छात्रालयातील बांधकामावरून मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व चौधरी यांच्यात वाद झाला होता. तसेच चौधरी यांनी मुख्याधिकाऱ्यांना धमकी दिली होती. यावेळी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौधरी यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता. ही घटना १४ जून रोजी घडली होती.
यानंतर चौधरी यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर शनिवारी कामकाज होऊन त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. त्यांच्या जामीन अर्जावर आता २२ रोजी सुनावणी होणार आहे. यानंतर रविवारी बाजारपेठ पोलीस स्थानकात हजर होत चौधरी यांनी आपला जबाब नोंदविला. त्यांच्यासमवेत ॲड. जगदीश कापडे, बाजार समितीचे सभापती सचिन चौधरी, आशिक खान, सतीश घुल, दुर्गेश ठाकूर उपस्थित होते.
माजी आमदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी जिल्ह्यातील मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदने
देखील दिले होते.
कोट
आपण मुख्याधिकाऱ्यांना ओळखत नाही, त्यांना अद्याप पाहिले सुद्धा नाही, आगामी निवडणुका पाहता राजकीय रंग असलेला हा गुन्हा आहे. अशा खोट्या गुन्हांना आपण घाबरत नाही. त्यामुळे नो चिंता.
- संतोष चौधरी, माजी आमदार.