जिल्हा परिषदेचे माजी सदस्य झाले गावचे सरपंच
By चुडामण.बोरसे | Updated: November 6, 2023 12:36 IST2023-11-06T12:35:22+5:302023-11-06T12:36:45+5:30
सरपंच पदासाठी कल्पनाबाई उत्तमराव महाजन ह्या विजयी झाल्या.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य झाले गावचे सरपंच
जळगाव : अमळगाव ता.अमळनेर येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गिरीश सोनजी पाटील (रा कॉँ) हे आता अमळगावचे सरपंच म्हणून निवडून आले आहेत.
गुढे ता. भडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ. उत्तमराव महाजन यांच्या परिवर्तन पॅनलला १५ पैकी ९ जागांवर विजय मिळाला आहे. सरपंच पदासाठी कल्पनाबाई उत्तमराव महाजन ह्या विजयी झाल्या.
विष्णुनगर ता.पाचोरा ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाच्या सविता रमेश राठोड विजयी तर आंबेवडगाव ता. पाचोरा येथे सरपंच पदी शिवसेना शिंदे गटाचे बबलू तडवी विजयी झाले आहेत.
अडावद ता.चोपडा सरपंच पदी राष्ट्रवादी ( शरद पवार ) गटाचे बबनखां तडवी विजयी झाले आहेत. मुडी ता. अमळनेर येथील सरपंच पदी राष्ट्रवादीच्या मंदाबाई भाऊराव पाटील विजयी.