माजी महापौर ललित कोल्हे यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 22:50 IST2020-05-27T22:49:31+5:302020-05-27T22:50:52+5:30
ललित कोल्हे लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा छापा

माजी महापौर ललित कोल्हे यांना अटक
जळगाव : बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या हल्ला प्रकरणात फरार असलेल्या माजी महापौर ललित कोल्हे यांना बुधवारी रात्री १० वाजता श्रद्धा काॅलनीतून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. कोल्हे सरिता माळी यांच्या घरी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी स्वत: सहकाऱ्यांसह छापा टाकला. पोलीस आल्याची कुणकुण लागताच कोल्हे माळी यांच्या घराच्या गच्चीवर लपून बसले होते. तेथून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
गोरजाबाई जिमखान्याजवळ १६ जानेवारी २०२० रोजी कोल्हे व त्यांच्या साथीदारांनी बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणात भाजप नगरसेवकासह पाच जणांना आधीच अटक झाली आहे.