मुक्ताईनगरचे माजी उपसरंच सात दिवसांपासून बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 22:18 IST2020-10-05T22:18:06+5:302020-10-05T22:18:13+5:30
पोलिसात दिली खबर

मुक्ताईनगरचे माजी उपसरंच सात दिवसांपासून बेपत्ता
मुक्ताईनगर : शहरातील रहिवासी व माजी उपसरपंच शेख मुशीर शेख मजिद मनियार (५३) हे गेल्या सात दिवसापासून बेपत्ता झाले आहे. ठिकठिकाणी शोध घेऊनही ते आढळून न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
मुशीर मनियार हे नेहमी प्रमाणे त्यांचे अवजड चारचाकी वाहनांचे व्यवहाराचा हिशेब करण्यासाठी अमरावती येथे २२ सप्टेंबर रोजी गेलेले होते. त्यानंतर ते २८ सप्टेंबर पर्यंत तेथेच होते. या काळात ते कुटुंबातील सदस्यांशी भ्रमणध्वनिवरून संपर्कात होते .मात्र २८ च्या सायंकाळी सर्व कामे आटपून ते मुक्ताईनगरला रवाना होतो असे सहकारी मित्रांना सांगून निघाले होते. मात्र ते मुक्ताईनगरला पोहोचलेच नाही. याच दिवसांपासून त्यांचा भ्रमणध्वनी देखील बंद येत आहे.
यामुळे नातेवाईकांनी गेल्या चार- पाच दिवसापासून ठिकठिकाणी त्यांचा शोध घेतला मात्र ते आढळून आले नाहीत. दरम्यान, त्यांचा शोध लवकर लागावा म्हणून ते हरवल्याची पोष्ट सोशल मीडियात व्हायरल करण्यात आलेली आहे.