मद्यसाठा प्रकरणातील सूत्रधार गजाआड

By Admin | Updated: September 26, 2015 00:34 IST2015-09-26T00:34:55+5:302015-09-26T00:34:55+5:30

धुळे : शिरूड येथे सापडलेल्या बनावट विदेशी मद्यसाठा प्रकरणाचा सूत्रधार दिनू उर्फ दिनेश निंबा गायकवाड याला तालुका पोलिसांच्या पथकाने चोपडा येथे अटक केली.

Formalist GazaAud in the wine case | मद्यसाठा प्रकरणातील सूत्रधार गजाआड

मद्यसाठा प्रकरणातील सूत्रधार गजाआड

धुळे : तालुक्यातील शिरूड येथे दोन महिन्यांपूर्वी सापडलेल्या बनावट विदेशी मद्यसाठा प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार दिनू उर्फ दिनेश निंबा गायकवाड याला तालुका पोलिसांच्या पथकाने चोपडा शहरातील बोरवले नगरातून शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता अटक केली. मद्यमाफिया दादा वाणी याच्यानंतर बनावट मद्यनिर्मिती व विक्री व्यवसायात सक्रिय असणारा सराईत गुन्हेगार दिनेश गायकवाडच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

तालुका पोलिसांच्या पथकाने शिरूड गावाजवळ सोनेरी नावाच्या शेतात असणा:या एका घरावर छापा घातला होता. या कारवाईत घराच्या आत जमिनीत केलेल्या हौदात सुमारे 1 लाख 88 हजार 775 रुपयांचा बनावट विदेशी मद्याचा साठा पोलिसांनी हस्तगत केला होता. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम 328, 420, 486, 488 सह मुंबई प्रोव्हीशन कायदा कलम अ, ब, क, ड, ई, फ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या कारवाईची माहिती पोलीस पोहोचण्याआधी मिळाल्याने दिनेश गायकवाड हा साथीदारांसह निसटला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. परंतु तो पोलिसांना सातत्याने गुंगारा देण्यात यशस्वी होत होता.

मोबाईल लोकेशन काढले

फरार असलेल्या दिनेश गायकवाड याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी त्याचे मोबाईल लोकेशन काढले होते. मात्र, ते सातत्याने ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना मिळून येत नव्हता़ खब:याकडून तो चोपडा शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक कमलाकर पाटील, हेकॉ अशोक पायमोडे, अन्वर पठाण यांच्या पथकाने चोपडा शहरात जाऊन गायकवाडला बोरवले नगरातून अटक केली़ पोलिसांनी सहा दिवसांपूर्वी गायकवाडची विना क्रमांकाची कार हस्तगत केली होती़

सहका:यांनंतर गवसला म्होरक्या

तालुका पोलिसांनी याच प्रकरणातील भुषण उर्फ भु:या राजेंद्र सुव्रे, बापू भिका मराठे, प्रविण निंबा गायकवाड या तिघांना गुरुवारी अटक केली़ त्यानंतर शुक्रवारी दिनेश गायकवाड पोलिसांच्या हाती आला़

 

Web Title: Formalist GazaAud in the wine case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.