शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वनशेती, चराई बंदी, कुºहाड बंदीने केले ‘पर्यावरण संवर्धन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 15:31 IST

स्तुत्य : निसर्ग हाच परमेश्वर- साहेबराव पाटलांनी राजवडमध्ये नटवली हिरवळ आणि जलसंपदा

संजय पाटील ।अमळनेर : एकेकाळी माळरान असलेल्या राजवड परिसरात चराई बंदी आणि कुºहाड बंदी करून स्वत:च्या शेतात वार्षिक उत्पन्न न घेता वनशेतीच्या माध्यमातून हजारो झाडे लावून कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी पर्यावरण संवर्धन केल्याने संपूर्ण खान्देशात दुष्काळ असताना राजवडला मात्र अवघ्या १४ फुटांवर विहिरीला पाणी असून सर्वत्र हिरवळ आहे.माळरान असलेल्या गावात साहेबराव धोंडू पाटील यांनी निसर्ग हाच परमेश्वर मानून गावात शेळी बंदी, चराई बंदी, कुºहाड बंदी केली आणि संपूर्ण शिवरातून गाजर गवत निर्मूलन केले आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या झाडे झुडपे यांच्या वाढीस चालना मिळाली. यासह झाडे लावल्यास वाहून जाणारे पाणी झाडे अडवून जमिनीत सिंचन वाढून विहिरींची पाणी पातळी वाढेल म्हणून त्यांनी स्वत:च्या २५ एकर शेतीत कापूस, ज्वारी, बाजरी, केळी, ऊस, डाळिंब, संत्रा, आंबे अशी वार्षिक उत्पन्न देणारी पिके न घेता ११ हजार सागवानी झाडे लावली. सागाच्या झाडांचे उत्पन्न १५ वर्षांनंतर मिळेल परंतु झाडांमुळे पर्यावरण संतुलन राखले गेले. यासह रस्त्याच्या दुतर्फा निंबाची झाडे लावली आहेत. परराज्यातून, प्रांतातून येणाºया धनगर, काठेवाडी यांच्या गुरांना गावात प्रवेश बंदी व चरायला बंदी घातल्याने परिसरात हजारो झाडे वाढली असून, स्वत:च्या शेतात नाला खोलीकरण, बांध बांधून शेततळे केल्याने वाहून जाणारे पाणी अडवण्यात आले आहेत. तसेच नाल्याच्या बांधावरदेखील वृक्ष लागवड केल्याने पावसाचे पाणी गाव शिवारात जिरवण्यात आले आहे.१या उपक्रमासाठी त्यांनी शासनाचीदेखील मदत घेतली. विविध उपक्रम स्वखर्चाने राबवल्याने शासनाने गावाला आदर्श गाव, संत तुकाराम वनग्राम पुरस्कार, त्यांना वनश्री, कृषिभूषण तर पत्नी पुष्पलता पाटील यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, पर्यावरण विकास रत्नसह इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच पर्यावरण संवर्धन संतुलन करण्यासाठी नशा बंदी, व्यसनमुक्ती, कोंडवाडा, शेणमक्ता बंदी केली. त्यामुळे गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वछता, राष्ट्रसंत तुकडोजी स्वच्छ ग्राम पुरस्कार मिळाले आहेत.२शेजारच्या गावांना रुक्ष वाळवंट दिसत असून पाणीटंचाई, टँकरची गरज पडत असताना मात्र राजवड येथे असंख्य झाडे लावल्याने गेल्या चार वर्षांपासून हिरवळ आहे आणि विहिरींना अवघ्या १४ फुटांवर पाणी आहे. मेच्या कडक उन्हाळ्यात तीन किलोमीटर अंतरावरून गावाला पाणीपुरवठा करूनदेखील विहिरीचे पाणी वनशेतीला दिले जाते. झाडांमुळे परिसरात पाऊसदेखील चांगला पडतो. त्यामुळे सिंचनही वाढत आहे.