म्हसावद ये‌थून दुचाकी चोरणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:21 IST2021-06-16T04:21:48+5:302021-06-16T04:21:48+5:30

जळगाव : म्हसावद येथून दुचाकी चोरणाऱ्या शक्तिसिंग खेतसिंग शेखावत (३२,रा.गोरीया,ता.दातारामगढ, जि.शिकर, राजस्थान, ह.मु.रामदेववाडी, ता.जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी (दि. ...

Foreign youth arrested for stealing two-wheeler from Mhaswad | म्हसावद ये‌थून दुचाकी चोरणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक

म्हसावद ये‌थून दुचाकी चोरणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक

जळगाव : म्हसावद येथून दुचाकी चोरणाऱ्या शक्तिसिंग खेतसिंग शेखावत (३२,रा.गोरीया,ता.दातारामगढ, जि.शिकर, राजस्थान, ह.मु.रामदेववाडी, ता.जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी (दि. १४) अटक केली. वाकडी, ता.जळगाव येथील शेतकरी शांताराम मिठाराम बागुल यांच्या मालकीची दुचाकी (क्र. एमएच १९ डीएच ७६१३) ५ जून रोजी सायंकाळी ७ वाजता म्हसावद येथ‌ून चोरी झाली होती. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. रामदेववाडी येथे वास्तव्यास असलेल्या शक्तिसिंग याच्याकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शक्तिसिंग हा वावडदा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांना त्याची माहिती कळविली. त्यानुसार गावकऱ्यांनी त्याला दुचाकीसह अडवून ठेवले होते. सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, मिलिंद सोनवणे, गणेश शिरसाळे, शशिकांत पाटील, स्वप्नील पाटील व योगेश बारी यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

Web Title: Foreign youth arrested for stealing two-wheeler from Mhaswad