युरियासोबत मिश्र खते घेण्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST2021-07-22T04:12:30+5:302021-07-22T04:12:30+5:30

एरंडोल : बहुप्रतीक्षेनंतर तालुक्यात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे खतांचा पहिला डोस देण्याच्या कामास गती प्राप्त झाली आहे. विशेषतः ...

Forced to take mixed fertilizers with urea | युरियासोबत मिश्र खते घेण्याची सक्ती

युरियासोबत मिश्र खते घेण्याची सक्ती

एरंडोल : बहुप्रतीक्षेनंतर तालुक्यात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे खतांचा पहिला डोस देण्याच्या कामास गती प्राप्त झाली आहे. विशेषतः युरिया खताची मात्रा देण्याचे काम वेगाने सुरू आहे. सर्वत्र शेतकरी युरिया विकत घेण्यासाठी खत विक्रेत्यांकडे जातात, परंतु खतविक्रेत्यांकडून मिश्र खते विकत घेण्याची सक्ती करत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.

युरियासह सर्व खते मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, अशा प्रकारची मिश्रखते घेण्याची कुठेही सक्ती केली जात नाही, असा दावा कृषी विभागातर्फे करण्यात आला आहे. एरंडोल तालुक्यात एकूण ४१ खत विक्रेते आहेत. विविध कार्यकारी सोसायटी, शेतकी संघ, घाऊक विक्रेते यांना जिल्हा स्तरावरून सुमारे ७०० ते ८०० टन युरियाची उपलब्धता करून देण्यात आली आहे, अशी माहिती कृषी खात्याच्या सूत्रांनी दिली आहे.

जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर करावा. सरळ व मिश्र खते संयुक्त खते यांच्या उपलब्धतेनुसार, आरोग्यपत्रिकेप्रमाणे खतांची मात्रा निश्‍चित करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे यांनी केले आहे.

Web Title: Forced to take mixed fertilizers with urea