शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

भुकेल्यांना अन्न, वंचितांना शिक्षण देणारा अवलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 13:07 IST

आनंद सुरवाडे  जळगाव : गरीबी व हलाखीच्या परिस्थितीने अनेक पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत नसल्याची बाब समोर आली व ...

आनंद सुरवाडे जळगाव : गरीबी व हलाखीच्या परिस्थितीने अनेक पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत नसल्याची बाब समोर आली व त्यांच्यासाठी काहीतरी करावे, हा विचार मनात घेऊन वंचितांना शिक्षण देण्याचा विडा उचलला व आज १३ मुले दत्तक घेतली, अनेकांना क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण दिले व आठ मुले आॅलिम्पियाडमध्ये सुवर्णपदकाची विजेतीही ठरली़ २४ वर्षाच्या अविनाश जावळे या तरूणांने अगदी कमात केलेले हे समाजकार्य आदर्श ठरले आहे़शनिपेठ भागातील रहिवासी असलेल्या अविनाश जावळे या तरूणाने डिएडचे शिक्षण घेतले आहे़ या शिक्षणाचा खरा उपयोग गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व्हावा, हे ध्येय मनाशी बाळगून अविनाशने वाढदिवसाला अशा गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्याचे ठरविले़ हा खर्च शाळेतील मुख्याध्यापकांकडे तो सुपूर्द करतो, अशा पद्धतीने त्याने १३ विद्यार्थी दत्तक घेतले़ यासह तो क्लासेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने शिक्षण देत आहे़ लहान वयातच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची ओढ लागावी म्हणून सामान्य ज्ञानाचे धडे तो देत असतो़ आॅडीओच्या माध्यमातून तो हे शिक्षण देत आहे़ आगामी काळात गणिते कशी सोडवावीत, पाढे लवकर कसे लक्षात ठेवावे, यासंदर्भात एक पुस्तक लिहीणार असल्याचा मानसही त्याने व्यक्त केला.गेल्या दीड वर्षांपासून अविनाश हा त्याचे बंधू धिरज जावळे, सुलतान पटेल व धनंजय सोनवणे यांच्या सहकार्याने साठ वर्ष व त्यावरील गरीब निराधार व गरजूंना अन्नदान करीत आहे़ पत्र्या हनुमान मंदिर, रेल्वेस्थाक, बसस्थानक आदी ठिकाणी बाहेर रस्त्यावर असलेल्या गरजू लोकांना या व्हॅनमधून अन्न पोहचविले जाते़ एखाद्या समारंभातील शिल्लक अन्न घेऊन ते वाटप करण्यात येते, ज्या दिवशी समारंभ नसतो त्यादिवशी अन्नसाखळीच्या माध्यमातून हा अन्नपुरवठा केला जातो़ मात्र, गेल्या दीड वर्षापासून नित्यनियमाने भुकेल्या गरजुंचे पोट भरण्याचे आदश कार्य या फूड बँकेच्या माध्यमातून होत आहे़तरूणांनी आपल्यातील कौशल्याचा उपयोग समाजातील गरजू, निराधारांच्या उद्धरासाठी करावा, वंचितांना शिक्षण द्यावे, तेव्हा त्या कौशल्याचा समाजहितासाठी व देशहितासाठी उपयोग होणे गरजेचे आहे़-अविनाश जावळे, निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान, उपमुख्याध्यापक, पाळधी स्कूल

टॅग्स :Jalgaonजळगाव