शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

ज्या भागात जे पिकते ते खा व सदृढ आयुष्य जगा - आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 12:25 IST

खाद्य कला, व्यायाम, पुरेशी झोप, योग्य वजन व आहार हीच निरोगी आयुष्याची पंचसूत्री

जळगाव : कोणत्या पदार्थातून किती ‘प्रोटीन, व्हिटॅमीन, कार्बोहायड्रेड, कॅलरीज’ मिळेल याचा विचार न करता दररोज डाळ, भात, भाकरी, पोळी, फळ आणि स्थानिक पदार्थासह त्या-त्या हंगामात येणारे व घरात पारंपारिकरित्या तयार होणाऱ्या आहाराचे सेवन केल्यास प्रत्येक व्यक्ती सदृढ आयुष्य जगू शकते, असा सल्ला प्रसिद्ध आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी रविवारी जळगावात दिला.स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे २५ नोव्हेंबर रोजी कांताई सभागृहात ‘आरोग्यम् धनसंपदा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मार्गदर्शन करताना दिवेकर यांनी हा सल्ला दिला. या वेळी प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर, डॉ. भावना जैन, प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दिपिका चांदोरकर उपस्थित होते.घरातील वजन काटा घालवासदृढ आरोग्यासाठी वजन कमी केले पाहिजे, असा हल्ली समज झाला आहे. त्यामुळे जो-तो वजन कमी करण्याच्या मागे लागला असून घरी सारखे-सारखे स्वत:चे वजन करीत असतो. तसे न करता आपण स्वत:च आपले वजन ओळखा. काम केल्यानंतरही ज्याचे हात-पाय दुखत नाही, तणाव येत नाही, कोणी काही बोलले तरी शांत राहू शकतो अशी ज्याची लक्षणे आहे त्या व्यक्तीची प्रकृती उत्तम आहे असे समजा, असे निरोगी शरीराचे साधे गणित दिवेकर यांनी या वेळी मांडले. घरात दर आठवड्याला पूर्वी रद्दी मोजली जायची, आता आपण स्वत:ला मोजतो, त्यामुळे आपण कोण आहे, हे ओळखा व घरातील वजन काटा आधी विकून टाका, असा सल्लाही त्यांनी दिला.शेती, स्वयंपाक घर व आजी यांचे नाते जोडाप्राणी जातीमध्ये ज्याच्याकडे बुद्धी आहे त्याच मानवाला आज खाण्याच्या-पिण्याच्या बाबतीत मार्गदर्शन घ्यावे लागते. इतर कोणत्याही प्राण्याला ‘डायट’ करावे लागले का, असा प्रश्न दिवेकर यांनी उपस्थित केला. खाण्या-पिण्याच्या बाबतीत ज्या भागात जे पिकते अर्थात स्थानिक पदार्थ सेवन करण्यासह प्रत्येक हंगामातील खाद्य व घरात आपली जी संस्कृती आहे ते पदार्थ सेवन करा आणि उत्तम आरोग्याचे धनी व्हा, असा सल्लाही त्यांनी योग्य आहारासंदर्भात दिला. यात शेती, स्वयंपाक घर आणि घरातील आजी यांचे नाते जोडून आहार घेतल्यास आयुष्यभर प्रत्येक व्यक्ती सदृढ राहू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.आपली खाद्य संस्कृती भविष्याचा वेध घेणारीआपल्याकडे पिकणारे ऊस, हळद-दूध, केळी, मका हे खाणे आपण विसरत चाललो आहे, मात्र हेच पदार्थ सेवन केल्यास त्याचे गुणकारी घटक किती फायदेशीर आहे, हे बाहेरून येऊन व पैसे घेऊन कोणी सांगितले तर आपल्याला त्याचे मोल कळते, अशी खंतही दिवेकर यांनी व्यक्त केली. त्यामुळे कोणत्या पदार्थात किती जीवनसत्व व इतर काय-काय आहे याचा विचार न करता तो जो पदार्थ आहे, तोच पदार्थ म्हणून त्याचे सेवन करा, असा सल्ला त्यांनी दिला. आपल्याकडील प्रत्येक खाद्य पदार्थाने शरीरास मोठे फायदे होतात. आपल्या या खाद्य संस्कृतीमुळेच प्रत्येकाचे भविष्य निरोगी राहू शकते, असेही दिवेकर यांनी नमूद केले. खाणे हीदेखील एक कला असून ती संभाळा, असेही आवाहन त्यांनी केले.योग्य व्यायाम कराव्यायाम करतानाही तो किती वेळ व कोणता करावा या विषयी मार्गदर्शन करताना दिवेकर म्हणाल्या की, सायकल चालविणे, पोहणे (जलतरण), सूर्यनमस्कार, चालणे व विविध आसने असे नियमित व्यायाम केल्यास शरीराचे वजनही वाढत नाही, असे सांगत स्वत:चे काम स्वत: करा, एकाच ठिकाणी जास्त वेळ बसू नका, असा सल्लाही दिवेकर यांनी दिली. धकाधकीच्या जीवनात व्यायामासाठी वेळ देता येत नाही, असे प्रत्येक जण म्हणतो, मात्र दररोज थोडातरी वेळ यासाठी काढा, असेही दिवेकर म्हणाल्या.रात्री साडे आठनंतर टिव्ही, मोबाईल करा बंदसदृढ आरोग्यासाठी पुरेसी झोपही महत्त्वाची आहे, मात्र हल्ली टिव्ही, मोबाईल यामुळे अनेकांच्या झोपा उडाल्या असल्याचे दिवेकर म्हणाले. त्यामुळे घरात रात्री साडे आठ वाजेनंतर टिव्ही, मोबाईलचा वापर टाळा व घरात संवाद वाढविण्यासह पुरेसी झोप घ्या, यातून प्रत्येक व्यक्ती निरोगी आयुष्य जगू शकले, असा सल्ला त्यांनी दिला. शेवटी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना दिवेकर यांनी उत्तरे दिला.दीपक चांदोरकर यांनी प्रास्ताविक केले तर अरविंद देशपांडे यांनी आभार मानले.या वेळी वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळींसह विद्यार्थी व महिलादेखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.ऋजुता दिवेकर यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :Jalgaonजळगाव