गणेशोत्सव काळात नियमांचे पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:20 IST2021-09-08T04:20:44+5:302021-09-08T04:20:44+5:30
चिनावल येथील गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शांततेत शासनाच्या व पोलीस विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गणेश ...

गणेशोत्सव काळात नियमांचे पालन करा
चिनावल येथील गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शांततेत शासनाच्या व पोलीस विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गणेश मंडळांना आवश्यक असल्याचे लवाण यांच्यासह सावदा पोलीस स्टेशनचे स.पो.नि. देवीदास इंगोले, पो.उ.नि. राजेंद्र पवार, समाधान गायकवाड यांनी केले. गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी चिनावलचे पोलीस पाटील नीलेश नेमाडे, तंटामुक्ती अध्यक्ष व माजी सरपंच योगेश बोरोले, नरेंद्र (बापू) पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गोपाळ नेमाडे, ग्रामपंचायत सदस्य सागर भारंबे, संदीप टोके, तसेच दिनेश महाजन, चेतन नेमाडे व सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य मोठ्या संख्येने हजर होते. सूत्रसंचालन व आभार दिलीप भारंबे यांनी मानले.