सुलवाडे-जामफळ योजनेच्या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा- मुख्यमंत्री

By admin | Published: May 17, 2017 05:04 PM2017-05-17T17:04:24+5:302017-05-17T17:04:24+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे जिल्हा दौ:यादरम्यान घोषीत केले.

Follow-up to Center for funding for Solvedi-Jamfal Scheme- Chief Minister | सुलवाडे-जामफळ योजनेच्या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा- मुख्यमंत्री

सुलवाडे-जामफळ योजनेच्या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा- मुख्यमंत्री

Next

ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 17 - जिल्ह्यातील जलयुक्त शिवारची कामे 20 जूनर्पयत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून दोन ते तीन तालुक्यांचे चित्र पालटू शकेल, अशा सुलवाडे-जामफळ योजनेला मान्यता दिल्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे जिल्हा दौ:यादरम्यान घोषीत केले. त्यासाठी लागणा:या निधीची केंद्राकडे मागणी करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांचे बुधवारी दुपारी साळवे येथील हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री तथा ग्रामविकास राज्यमंत्री  दादा भुसे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी  ओमप्रकाश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, सरपंच शकुंतला गिरासे उपस्थित होते.

डिजिटल शाळांचे उत्कृष्ट काम
मुख्यमत्री फडणवीस यांनी शिंदखेडा तालुक्यातील साळवे येथील जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन तेथील डिजिटल शाळा उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी त्यांनी विद्याथ्र्यांशी संवाद साधला.
या सोबतच साळवे येथील विविध विकास कामांना भेटी देऊन पाहणी केली. त्यांनी जलयुक्त शिवार अभियानातील कामे, रमाई आवास योजना, फळबाग लागवड योजनच्या उपक्रमासही भेट दिली.
आवास योजना लाभार्थीशी साधला संवाद
मुख्यमंत्री फडणवीस यांनी रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल लाभार्थी रोहिदास वाघ आणि सीताबाई वाघ यांच्या घरांना भेट देऊन संवाद साधला. त्यानंतर त्यांनी जलयुक्त शिवार अभियानातील नाला खोलीकरण कामाची  पाहणी केली.
फळबाग लागवड योजनेचे कौतुक
साळवे- शिंदखेडा मार्गावरील दरखेडा येथील रोजगार हमी योजनेतील फळबाग लागवड योजनेसही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देऊन लाभार्थी नटराज भटा पाटील यांच्याशी संवाद साधला आणि पिकाची माहिती घेतली. या वेळी त्यांनी फळबाग लागवड योजनेतून केलेल्या डाळींब लागवडीचे त्यांनी कौतुक केले.
पुढील वर्षार्पयत धुळे जिल्हा हगणदारीमुक्त
स्वच्छ भारत अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यात चांगले कामे झाले असून जिल्ह्यात 50 हजार स्वच्छतागृह बांधली आहे. 26 जून 2018र्पयत धुळे जिल्हा हगणदारीमुक्त करण्याचा मनोदय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  जययुक्त शिवार, नरेगाच्या कामांचा आढावा घेतल्याचे सांगून चांगली कामे झाल्याची पावती त्यांनी दिली.

Web Title: Follow-up to Center for funding for Solvedi-Jamfal Scheme- Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.