पारोळ्यात गुलाला ऐवजी गणरायावर पुष्पवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 23:27 IST2018-09-24T23:23:33+5:302018-09-24T23:27:00+5:30
पारोळा शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक शांततेत पार पडली.

पारोळ्यात गुलाला ऐवजी गणरायावर पुष्पवृष्टी
पारोळा- शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक शांततेत पार पडली. सायंकाळी ७.४५ वाजता या गणेशोत्सव मिरवणुकीला सुरवात झाली होती.
नगर पालिका कर्मचारी गणेश मंडळ, सार्वजनिक गणेश मंडळ, कीर्ती गणेश मंडळ, दोस्त गणेश मंडळ, आदर्श गणेश मंडळ, बालाजी स्वयंसेवक गणेश मंडळ, श्रीराम गणेश मंडळ, कासार गल्ली गणेश मंडळ, स्वराज्य गणेश मंडळ, भोई गल्ली गणेश मंडळ आदी मंडळ या सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते.रथ चौक, कासार गणपती चौक,बहिरम गल्ली,त्रिमूर्ती चौक,सोनार मंगल कार्यालय, गुजराथी गल्ली,गावहोळी चौक ,नगर पालिका,बाजारपेठ, शिवाजी महाराज पुतळा, आशिया महामार्गावरून महावीर नगरातील खदाणीत विसर्जन करण्यात आले . डीजे डॉल्बीला बंदी होती. पण त्या त्या मंडळाचे पदाधिकारी पारंपारीक नृत्य व बँड, डोल,ताशांच्या गजरात बेधुंद होऊन नाचत होते. सुमारे चार ते साडे चार तास ही मिरवणूक चालली. मिरवणूक पाहण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती.
गावंहोळी चौकात गणेश मंडळ १२ वाजता पोहचले. या ठिकाणी बँड 'डोल ताशे सर्व बंद झाले. सुमारे एक ते दीड च्या सुमारास महावीर नगराच्या खदाणीत,म्हसवे गावा जवळील फाईल च्या तलावात गणपती विसर्जन करण्यात आले. क्रेनच्या साह्याने गणपती तलावात सोडण्यात आले.