शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

मुंबईहून जळगाव येणारे विमान दोन दिवसांपासून रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 22:23 IST

दाट धुक्यांचा परिणाम : अहमदाबादहून येणारे विमानही विलंबाने

जळगाव : दाट धुक्यांमुळे घावपट्टीवर विमान उतरवितांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असल्यामुळे मुंबईकडून सायंकाळी जळगावला येणारे विमान दोन दिवसांपासून रद्द करण्यात येत आहे. तर अहमदाबादहूनही सकाळी येणारे विमान एक तास विलंबाने येत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.गेल्या आठवड्यात अतिवृष्टी आणि खराब हवामानामुळे वारंवार विमानसेवा रद्द झाल्याचा प्रकार घडल्यानंतर, आता गेल्या दोन दिवसापासून वातावरणात अतिशय दाट धुके पडत असल्यामुळे याचाही विमान सेवेवर परिणाम झाला आहे. विमान धावपट्टीवर उतरतांना पायलटला किमान ५ किलोमीटर अंतरावरुन धावपट्टी दिसणे आवश्यक आहे. मात्र, जळगाव विमानतळ परिसरात अतिशय दाट धुके असल्यामुळे पायलटला ही धावपट्टी अस्पष्ट दिसत आहे. त्यामुळे अहमदाबादहून सकाळी १०. २५ मिनिटांनी येणारे विमान, सकाळी साडेअकराला येत आहे. तसेच मुंबईवरुन येतानांही सायंकाळी अतिशय दाट धुके असल्यामुळे जळगावला विमान न येता मुंबईहून अहमदाबादला रवाना होत आहे. दोन दिवसापासून हा प्रकार घडत आहे.अनेक प्रवाशांकडून तिकीट रद्दगेल्या दोन दिवसापासून दाट धुक्यामुळे मुंबईकडून येणारी विमान सेवा रद्द होत असल्यामुळे, अनेक प्रवाशांनी तिकीट रद्द केले जात असल्याची माहिती विमान कंपनीच्या सुत्रांनी दिली. तसेच यामुळे तिकीट विक्रीवर मोठा परिणाम झाला असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.विमान कंपनीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसापासून जळगावहून मुंबईला जाण्यासाठी विमानाला दोन तासांपर्यंत विलंब होत आहे. मुंबईला गेल्यानंतर पुन्हा कोल्हापूरला जातांना विलंब होतो. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने, मुंबईहून कोल्हापूरसाठी स्वतंत्र विमान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ज्यामुळे मुंबईहून जळगावला लवकर विमान येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाJalgaonजळगाव