एक मार्चपासून आठवड्यातून चार दिवस मुंबईची विमानसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:25 IST2021-02-23T04:25:06+5:302021-02-23T04:25:06+5:30
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून जळगावची विमानसेवा नियमित सुरू आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार ...

एक मार्चपासून आठवड्यातून चार दिवस मुंबईची विमानसेवा
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून जळगावची विमानसेवा नियमित सुरू आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार सुरुवातीपासून ही अहमदाबाद ते जळगावची सेवा तीन दिवस तर जळगाव ते मुंबईची विमानसेवा आठवड्यातुन एकच दिवस सुरू होती. यामुळे विशेषत : मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांची गैरसोय होत होती. मात्र, राज्य शासनाने नियमित सेवेच्या बाबतीत नुकतेच काही निर्बंध उठविल्यामुळे १ मार्चपासून मुंबईकडे जाणाऱ्या फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. आठवड्यातून दर सोमवारी, शुक्रवारी, शनिवारी व रविवारी नियमित मुंबईची विमानसेवा राहणार आहे. तर अहमदाबाद ते जळगावची सेवा दररोज राहणार आहे. दरम्यान, अहमदाबादहून जळगावकडे विमानाची येण्याची वेळ ही पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणेच आहे. मात्र, आठवड्यातील चार दिवस मुंबईच्या सेवेच्या दिवशी जळगावहून अहमदाबादला जाण्यासाठी सायंकाळी सात वाजता राहणार असल्याचे विमान कंपनीतर्फे कळविण्यात आले आहे.
इन्फो :
जळगावच्या प्रवाशांना आता नांदेडलाही जाता येणार
विमान कंपनीतर्फे आठवड्यातून चार दिवस मुंबईची राहणार असल्याने, या सेवेला नांदेड शहर जोडण्यात आले आहे. जळगावहून मुंबईला विमान गेल्यानंतर त्या ठिकाणाहून हे विमान नांदेडला जाणार आहे. नांदेडहून पुन्हा मुंबईला येणार आहे व मुंबईहून पुन्हा जळगावला आणि जळगावहून अहमदाबादला जाणार आहे. या सेवेमुळे जळगावच्या प्रवाशांना मुंबईसह याच विमानाने नांदेडलाही जाणे सोयीचे झाले आहे.
इन्फो :
येत्या १ मार्चपासून विमान कंपनीतर्फे जळगाव ते मुंबईची विमानसेवा आठवड्यातून चार दिवस देण्यात येणार असून, या सेवेला नांदेड शहर जोडण्यात आले आहे. त्यामुळे जळगावच्या प्रवाशांना नांदेडलाही जाता येणार आहे. तर अहमदाबाद ते जळगाव ही सेवा दररोज असणार आहे.
नैमिश जोशी, वितरण व्यवस्थापक, ट्रू जेट एअरलाईन्स