शेताच्या बांधावरील ठिबक नळ्यांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 12:47 IST2017-04-18T12:47:02+5:302017-04-18T12:47:02+5:30

नागलवाडी रस्त्यावर असलेल्या गुलाब महाजन यांच्या मालकीच्या शेतातील सहा एकरवरील ठिबक नळ्यांना अज्ञाताने आग लावून दिली

Flame on drip stems from the fields | शेताच्या बांधावरील ठिबक नळ्यांना आग

शेताच्या बांधावरील ठिबक नळ्यांना आग

 चोपडा,दि.18- येथील नागलवाडी रस्त्यावर असलेल्या  गुलाब महाजन यांच्या मालकीच्या  शेतातील सहा एकरवरील ठिबक नळ्यांना अज्ञाताने आग लावून दिली. यात शेतक:याचे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.

चोपडा येथे नागलवाडी रस्त्यावर सदाशिव पुंडलिक चौधरी यांचे शेत गट नं 210/4 मधील सहा एकर क्षेत्र गुलाब लक्ष्मण महाजन यांनी कराराने केले आहे. गेल्या  जून महिन्यात दोन लाख रूपयांच्या  ठिबक नळ्या घेऊन कापसाचे पीक घेतले. तसेच कापसावर हरभरा घेऊन खरीप  हंगामासाठी शेत तयार करण्यासाठी नळ्या गोळा करून बांधावर ठेवल्या होत्या.  17 रोजी दुपारी अडीचवाजेनंतर  कोणीतरी अज्ञात इसमाने ठिबक नळ्या पेटवून दिल्या.  यात सर्व नळ्यांची राख झाल्याने शेतक:याचे दीड लाखाचे  नुकसान झाले.

Web Title: Flame on drip stems from the fields