विचित्र अपघातात पाच वाहनांचे नुकसान

By Admin | Updated: May 6, 2017 17:55 IST2017-05-06T17:55:14+5:302017-05-06T17:55:14+5:30

या अपघातात ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला आहे

Five vehicles lost in a strange accident | विचित्र अपघातात पाच वाहनांचे नुकसान

विचित्र अपघातात पाच वाहनांचे नुकसान

ऑनलाइन लोकमत

मुक्ताईनगर, जि. जळगाव, दि. 6 -  महामार्ग चौफुलीवर पहाटे पाच वाजेच्या सुमारास विचित्र अपघात होऊन पाच वाहनांचे मोठे नुकसान झाले. वाहने हॉटेलमध्ये घुसल्याने टेबल-खुर्चीची मोडतोड होऊन भिंतही कोसळली. या अपघातात ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला आहे.
भुसावळकडून नागपूरकडे जाणारा ट्रेलर क्र.(आर.जे.14/3666) हा पहाटे पुढे असलेल्या आईस्क्रीम कंटेनर क्र.(जी.जे.01/बी.वाय.5514) यास ओव्हरटेक करीत असताना समोरून दुसरे वाहन येत असल्याने ट्रेलर चालकाने वाहन डाव्याबाजूस वळविले. यात या ट्रेलरसह पुढे चालणारे आईस्क्रीम कंटनेर हॉटेलमध्ये घुसले. यात तेथे उभी असलेली कार व दुचाकी क्र(एम.एच.19 डी.ओ.1786) व अन्य एक दुचाकी क्र.(एम.एच.15 बी.क्यु.1928) या तिन्ही वाहनांवर धडकली. तसेच  हॉटेलमध्ये टेबल  खुर्ची तोडून ही वाहने थेट भिंतीवर धडकली. यात ट्रेलर चालक सुदाम भुरमल हा गंभीर जखमी झाला.  ट्रेलर, कंटेनर, कारसह दोन्ही मोटार सायकल अशा पाचही वाहनांचे जबर नुकसान झाले.

Web Title: Five vehicles lost in a strange accident