शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार अपहारप्रकरणी पाच अधीक्षकांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 12:15 IST

जळगाव : शालेय पोषण आहार गैरव्यवहार प्रकरणी चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, बोदवड व धरणगाव येथील शालेय पोषण आहार अधीक्षकांवर ठेवण्यात ...

ठळक मुद्दे पाच तालुक्यातील प्रकार

जळगाव : शालेय पोषण आहार गैरव्यवहार प्रकरणी चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, बोदवड व धरणगाव येथील शालेय पोषण आहार अधीक्षकांवर ठेवण्यात आलेल्या ठपक्याच्या पार्श्वभूमीवर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. यात नाशिक येथील सहाय्यक आयुक्तांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी जामनेर येथील चौकशीचे आदेश देण्यात आले होते.या संदर्भात सविस्तर असे की, या पाच तालुक्यातील शालेय पोषण आहाराचे धान्य काळ्या बाजारात परस्पर विक्री झाल्याचे प्रकरण गाजले होते. याबाबत जिल्हा परिषदेच्या विविध सभा तसेच विधानसभेच्या अधिवेशनातही हा विषय गाजला होता. पोलीस प्रशासनाला याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी १८ आॅगस्ट २०१६ रोजी आपला अहवालदेखील दिला होता. त्यानुसार संबंधीत अधिकाºयांचे खुलासेही मागविण्यात आले होते.यांच्यावर होता ठपकाया प्रकरणात एस.पी. विभांडीक (चाळीसगाव), एस.एस. पाटील (पाचोरा) , व्ही.आर. कुमावत (भडगाव), व्ही.एस. धनके (बोदवड) आणि ए.पी. बाविस्कर (धरणगाव) या पाच शिक्षण विस्तार अधिकाºयांवर ठपका ठेवण्यात आला होता. शालेय पोषण आहाराचे धान्य काळ्या बाजारात चढ्या भावाने विकण्यास नेले जात असताना पोलीसांनी ते पकडले होते. तपासात हे धान्य पोषण आहाराचे असल्याचे निष्पन्न झाले. या अधिकाºयांकडे अधीक्षकपदाची जबाबदारी असताना त्यांनी वेळोवेळी पोषण आहाराची तपासणी केली असती किंवा दप्तर तपासणी केली असती तर अशा गैरव्यवहारास आळा बसला असता मात्र त्यांनी तसे केले नसल्याने कामात कसूर केल्याचे सिद्ध होत असल्याने या प्रकरणात अधीक्षक हे व्यक्तीश: दोषी असून त्यांनी महाराष्टÑ जिल्हा परिषद सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ३ चे उल्लंघन केलेले दिसून येत असल्याचे जि.प. मुख्यकार्यकारी अधिकाºयांनी आपल्या पत्रात नमुद केले आहे.सहाय्यक आयुक्त करणार चौकशीपाच अधीक्षकांवर ठेवण्यात आलेल्या दोषरापांची चौकशीसाठी आता नाशिक येथील सहाय्यक आयुक्तांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकाराची दोन महिन्यांच्या आत त्यांनी चौकशी करून चौकशी अहवाल सादर करावयाचा आहे. ही चौकशी करताना नियमांचे अत्यंत काटेकारपणे पालन करणे आवश्य राहील असेही या संदर्भातील आदेशात म्हटले आहे. या चौकशीत सादरकर्ता अधिकारी म्हणून जि.प. उपशिक्षणाधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी चौकशी अधिकाºयांना मागणी केल्यानुसार आवश्यक ती कागदपत्रे पुरवावीत असेही जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.खुलाशात आरोप नाकारलेयाप्रकरणी पाचही शिक्षण विस्तार अधिकाारी तथा पोषण आहार अधीक्षकांवर ठेवण्यात आलेल्या ठपक्याचे उत्तर देतांना त्यांनी आरोप नाकारले होते. ही बाब लक्षात घेऊन आता जिल्हा परिषद प्रशासनाने पाचही शिक्षण विस्तार अधिकारी तथा अधीक्षकांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्यावरील दोषारोपातील बाबींसंदर्भात आता चौकशी केली जाणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद