पाच विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
By Admin | Updated: November 17, 2014 12:17 IST2014-11-17T12:17:03+5:302014-11-17T12:17:03+5:30
'महाजेनको' कंपनीतर्फे त्रिमूर्ती इन्स्टिट्यूटमध्ये रविवारी कनिष्ठ पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत पाच विद्यार्थ्यांजवळ आधारकार्ड नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले.

पाच विद्यार्थी परीक्षेपासून वंचित
>जळगाव : 'महाजेनको' कंपनीतर्फे त्रिमूर्ती इन्स्टिट्यूटमध्ये रविवारी कनिष्ठ पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत पाच विद्यार्थ्यांजवळ आधारकार्ड नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले.
ऑनलाइन होणार्या स्पर्धा परीक्षेसाठी आता आधारकार्ड आणण्याची सक्ती केली जात आहे. सत्य प्रत परीक्षार्थीजवळ नसेल तर विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जात नसून त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्रिमूर्ती इन्स्टिट्यूटमध्ये रविवारी दुपारी २ ते ३.३0 दरम्यान घेण्यात महाजेनकोतर्फे पेपर घेण्यात आला. बाहेरगावाहून परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांजवळ हॉल तिकीट होते. मात्र, पाच विद्यार्थ्यांजवळ आधारकार्डची छायांकित प्रत असल्यामुळे परीक्षा केंद्रातील पर्यवेक्षकांनी संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नाही, त्यामुळे परीक्षार्थींचा हिरमोड झाला.
१0 विद्यार्थी गैरहजर
या परीक्षेसाठी ७0 विद्यार्थी प्रविष्ट होते. ५५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. पाच विद्यार्थ्यांजवळ ओळखपत्र (आधारकार्डची सत्यप्रत) नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यात आले नाही. उर्वरित १0 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते.
४८0 विद्यार्थ्यांनी दिली पशुधन पर्यवेक्षक पदाची परीक्षा
दरम्यान, जिल्हा परिषदेतील पशुधन पर्यवेक्षक पदासाठी रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षेत ४८0 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. सकाळी दहा ते साडेअकरा या दरम्यान पेपर झाल्यानंतर दुपारी २ ते ३.३0 या दरम्यान कनिष्ठ सहायक लेखा व कनिष्ठ सहायक लिपिकपदाची परीक्षा झाली.
या परीक्षेत २७१ परीक्षार्थींपैकी १७४ परीक्षार्थी हजर होते. ९७ परीक्षार्थींनी परीक्षेला दांडी मारली.